वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
चोरी तर जमली नाही पण हातात पडल्या बेड्या !
घरफोडीचा प्रयत्न करीत असलेल्या चोरट्यांचा पोलिसांनी तपास करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या बाबतची माहिती अशी की, शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० वा. च्या सुमारास मौजे माळेवाडी शिवारातील शेत गट नं. १३ मधील रावसाहेब उत्तम जाधवर यांच्या राहत्या घराचे कडी -कोंडा तोडुन घरात घुसून घरफोडी करण्याच्या उदेशाने घरातील सामानाची शोधाशोध करत असताना दादा देवराव काळे रा. माळेवाडी ता. केज आणि संतोष भिमा पवार रा. कळंब मिळुन आले. तर भैया बलभिम उर्फ अशोक शिंदे रा. केवड ता. केज पळून गेला.
सदाशिव सुर्यभान जाधवर यांच्या फिर्यादी दादा देवराव काळे रा . माळेवाडी ता. केज संतोष भिमा पवार रा. कळंब आणि भैया बलभिम उर्फ अशोक शिंदेया तिघांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं ५००/२०२२ भा. दं. वि. ४५७, ३८०, ५११ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दादा देवराव काळे रा. माळेवाडी ता. केज आणि संतोष भिमा पवार रा. कळंब यांना बेड्या ठोकल्या आहेत.
सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूर घाट दूरस्थ पोलिस चौकीचे पोलिस नाईक अशोक मेसे हे पुढील तपास करीत आहेत.