केज तालुक्यात सर्व शाळाला प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे सांगुन देखील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक उदासीन
वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गट साधन केंद्र केज च्या माध्यमातुन केज तालुक्यातील जि.प. शाळा , खाजगी संस्था , इंग्लिश स्कुल मधील इयत्ता आठवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धचे अयोजन केले होते त्या स्पर्धेपैकी २९ व ३० जुन रोजी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन प्रत्येक शाळेमध्ये केले होते .
आज वकृत्व स्पर्धचे आयोजन गट साधन केंद्र येथे करण्यात आले होते .स्पर्धेमध्ये एकुण केज शहरामधुन चांगला तर केज तालुक्यातुन अल्प प्रतिसाद मिळाला . स्पर्धा ठिक ११ वाजता सुरु करण्यात आली . या स्पर्धेसाठी गटशिक्षण अधिकारी केंद्रे साहेब तथा स्पर्धकांचे निरीक्षण करण्यासाठी विषय साधनव्यक्ती कदम मॅडम, शेख नयुम सर , सय्यद तबस्सुम मॅडम , भाऊसाहेब वाघमारे सर , रुपनर मॅडम , वेदपाठक सर हे होते. प्रथमतः सर्व विद्यार्थ्याना स्पर्धेचे नियम वेदपाठक सरांनी सांगीतले . या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यानी विषायानुसार मनोगत व्यक्त केले.
गटशिक्षण अधिकारी केंद्रे साहेब यांनी तात्काळ वकृत्त्व स्पर्धेमध्ये विजयी विद्यार्थाचे नावे जाहीर केले त्याप्रमाणे .
(मराठी /इंग्रजी विभागामध्ये )
प्रथम क्रमांक इयत्ता नववी ची विद्यार्थिनी कु. कापरे प्रिया महादेव ( जि.प.मा.शा. भांटुबा ) तिला मार्गदर्शन आचार्य मॅडम व प्रमोद शिंदे सर यांनी केले तसेच द्वितीय क्रमांक इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु.उत्कर्षा रघुनाथ राऊत ( कनिश्वर विद्यालय कानडी माळी ) तर तृतीय क्रमांक पवनराजे इंग्लिश स्कुल केजची विद्यार्थ्यीनी कु. मैथली पांडुरंग चौरे (इयत्ता नववी ) हिने पटकावला तिला मार्गदर्शन विनोद गुंड सर यांनी केले .
(उर्दु विभागामध्ये )
प्रथम क्रमांक इयत्ता नववी ची विद्यार्थीनी कु. शेख खैरुनीसा कमर ( मा.शा. नुरजहाँ केज )तृतीय क्रमांक इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. फारोकी अमिना अनय करिम ( नुरजहाँ केज ) तर तृतीय क्रमांक इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. शेख अरजीयाँ अहेमद ( जि.प. उच्च प्राथमिक अजिजपुरा केज ) यांनी पटकवला.
यानंतर सर्व विजय स्पर्धेकांचे स्वागत गटशिक्षण अधिकारी केंद्रे साहेब यांनी केले तर अध्यक्षीय समारोपात केज तालुक्यातील जि.प. शाळा , सर्व संस्थांनी प्रत्येक स्पर्धेत, कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे , तसेच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधावा व केंद्र प्रमुख , मुख्याध्यापक , शिक्षक यांनी कामचुकारपना न करता आपण शिक्षक आहोत याची जाणीव ठेवुन आपापले कार्य प्रमाणीकपणे करावे व शासकीय आदेशाची प्रभावीपणे अमलबजावनी करावी असे मनोगत व्यक्त केले. जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व विद्यार्थ्यास शुभेच्छा दिल्या .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!