Uncategorized

‘” पती पत्नी और वो ” मास्तरणीने मास्तर नवरा सोडून केले ड्रायव्हरशी लफडे !मास्तरीण आणि तिच्या प्रियकरा विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल !

मास्तरीणबाई लागल्या ड्रायव्हरच्या नादी ; म्हणून मास्तर नवऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले !

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या : साडेतीन महिन्या नंतर गुन्हा दाखल !

वादळवार्ता – गौतम बचुटे

पती-पत्नी दोघेही शिक्षक असताना मास्तरीणबाई चक्क त्यांच्या गाडीवर असलेल्या खाजगी ड्रायव्हरच्या नादी लागल्या. त्या ड्रायव्हरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या त्या मास्तरीणबाईने नवऱ्या पासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला. त्या माणसिक तणावातून तिच्या शिक्षक नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नवऱ्याने आत्महत्या केल्याची तक्रार देणाऱ्या बायको आणि ‘तिचा’ ‘तो’ प्रियकर ड्रायव्हर यांच्या विरुद्ध साडेतीन महिन्या नंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

धारूर तालुक्यातील आसरडोह येथील चंद्रकांत सुरवसे हे आसोला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहशिक्षक तर त्यांची पत्नी देखील शिक्षिका असून ती येथे सहशिक्षका म्हणून काम करीत होती. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत.

दोघेही पती-पत्नी सरकारी नौकरीला असल्याने त्यांनी एक नवी कोरी स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली. ती गाडी चालविण्या साठी गावातील एक ड्रायव्हर ठेवला. त्यामुळे चंद्रकांत सुरवसे सर यांची पत्नी आणि ड्रायव्हर यांच्यात जवळीक आली. त्याची कुणकुण चंद्रकांत सुरवसे आणि त्यांच्या भावाला लागली. त्यामुळे चंद्रकांत सुरवसे व त्यांच्या पती-पत्नीत वारंवार भांडणे होत होती. चंद्रकांत सुरवसे यानी ही माहिती त्यांच्या भावाला पण दिली होती. त्या सर्वांनी तिला असे वागू नकोस असे सांगितले परंतु ती ड्रायव्हर याच्यात एवढी गुरफटलेले होती की, ती कुणाचेही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. उलट ती प्रियकर ड्रायव्हर सोबत पती-पत्नी सारखी बिनधास्त वागत होती. त्यांचे अनैतिक संबंध सुरू होते. तिने प्रियकर ड्रायव्हर याला कामावरून काढण्यास नकार दिला होता.

या तिच्या अशा वागण्यामुळे आणि ड्रायव्हर सोबतच्या अनैतिक संबंधामुळे चंद्रकांत सुरवसे हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यातच ड्रायव्हरशी अनैतिक संबंध ठेवलेल्या त्यांच्या पत्नीने त्यांच्या पासून कायम संबंध तोडून घटस्फोट मिळण्यासाठी माजलगाव येथील न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता.

 त्यामुळे त्यांच्या मानसिक छळाला कंटाळून चंद्रकांत सुरवसे यांनी दि. ५ एप्रिल रोजी आसरडोह येथील समाधान देशमुख यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यानंतर मयत चंद्रकांत सुरवसे यांचे शवविच्छेदन हे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्याय वैद्यक विभागात करण्यात आले त्या नंतर दि. ६ एप्रिल रोजी त्यांच्यावर असरडोह येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

त्या नंतर दि. ९ एप्रिल रोजी मयत चंद्रकांत सुरवसे यांच्या पत्नीने धारूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून ही आत्महत्या असल्याचा बनाव करून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र त्या नंतर काही दिवसांनी मयत चंद्रकांत सुरवसे यांच्या मुलांनी ही सर्व माहिती त्याच्या चुलत्यांना दिली. त्यांच्या हाती प्रियकर ड्रायव्हर याने त्याच्या आईने सोबतच्या संबंधाचे काही पुरावे हाती लागले.

त्या नंतर दि. २३ जुलै रोजी मयत चंद्रकांत सुरवसे यांचे भाऊ बंडू सुरवसे आणि कुटुंबातील सदस्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांची भेट घेतली त्यांना सर्व पुरावे आणि मयत चंद्रकांत सुरवसे त्यांच्या पत्नीचे ड्रायव्हर सोबत असलेले अनैतिक संबंध उघड केले.

त्या नुसार दि. २३ जुलै मयताचे भाऊ बंडू सुरवसे यांच्या फिर्यादी वरून चंद्रकांत सुरवसे यांना त्यांची पत्नी व प्रियकर ड्रायव्हर या दोघांच्या विरुद्ध गु. र. न.. २२५/२०२३ भा. दं. वि. ३०६ आणि३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रेमाच्या पती,पत्नी और वो प्रकरणी धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे हे करीत आहेत .

[ तिने गिरवला ड्रायव्हर सोबत प्रेमाचा धडा अन् त्याने स्टेअरिंग सोडून टाकला प्रेमाचा टॉप गिअर ! ]

घटनाक्रम :-

* जानेवारी — माजलगाव न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज

* ५ एप्रिल — चंद्रकांत सुरवसे यांनी गळफास घेतला

* ६ एप्रिल — आसरडोह येथे अंत्यसंस्कार

* ९ एप्रिल — धारूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

* दि. २३ जुलै — आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पत्नी आणि तिच्या ड्रायव्हर प्रियकरा विरुद्ध गुन्हा दाखल

मुलींचेही वेषांतर करून तिला हैद्राबादला घेऊन गेला :- काही दिवसां पूर्वी मास्तरीणबाईचा प्रियकर हा चंद्रकांत सुरवसे यांच्या मुलीला तिचे वेषांतर करून हैद्राबादला गेला होता. ते वेषांतराचे फोटो तिच्या मोबाईल मध्ये होते; परंतु ते फोटो नंतर डिलीट केले. अशी माहिती सुरवसे यांच्या कुटुंबातील लोकांनी दिली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!