आपला बीड जिल्हाआरोग्य

“माता सुरक्षित तर घर सुरक्षित”अभियानाला सुरुवात ..!

वादळवार्ता वार्तांकन – केज

आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कल्पनेतुन महाराष्ट्रामध्ये दि.२६.०९.२०२२ ते दि.०५.१०.२०२२ या कालावधी मध्ये “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानामध्ये १८ वर्षेवरील महिला,बालके व गरोदर माता यांना पुर्णपणे मोफत सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये संपुर्ण कालावधी मध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चंदन सावरगाव, केज जि.बीड येथे ही सेवा देण्यात येणार असून सदर अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ.देशपांडे यांनी केले आहे.

सदर अभियानात स्त्रीरोग तज्ञांमार्फत गरोदर महिलांची तपासणी,गरोदर महिलांची शारीरीक तपासणी.(यामध्ये वजन,रक्तदाब, हिमोग्लोबीन,रक्तगट),सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्यां,सोनोग्राफी तपासणी,१८ वर्षेवरील मुलींचे वरिल कालावधी मध्ये गर्भधारणा पुर्व काळजी,मासिक पाळी मधील समस्या,सॅनिटरी पॅडस्चा वापर,मासिक आरोग्य या विषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच ३० वर्षावरील सर्व महिलांची रक्तदाब,मधुमेह व कर्करोगा संबंधी तपासणी, क्ष-किरण तपासणी,बालकांचे लसिकरण तसेच कोविड लसिकरण,दिव्यांग लाभार्थीना अपंगत्वाचे प्रमाणपत्र व युडी आयडी क्रमांक देण्यात येणार आहे.त्याचबरोबर नेत्र तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दरम्यान,शालेय आरोग्य तपासणी पथका मार्फत शाळेंतील बालकांची तपासणी (यामध्ये टंगटाय,फायमोसिस,सिस्ट व इतर लघु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत) तरी चंदन सावरगाव मधील १८ वर्षावरिल महिला महिलांनी जास्तीत जास्त या “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियाना अंतर्गत तपासणी करुन घेण्याचे आहे.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चंदन सावरगाव येथे सरपंच सौ.त्रिवेणी वाघमारे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले,डॉ.देशपांडे मॅडम,सौ.तारडे मॅडम,श्री.तिवारी सर,कार्यक्रमाला आशा सेविका सलीमा शेख,आनिता नखाते व मदतनीस बिस्मिल्लाबी शेख,या हजर होत्या.गरोदर मातांची तसेच कार्यक्रमामध्ये गावातील उपस्थित राहिल्या किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी विषयी सूचना देण्यात आल्या.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!