दहा दिवसानं पासुन अंबाजोगाई येथील कार्यालय बंद
वादळवार्ता – केज
केज शहरामधुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग त्या महामार्गाचे तब्बल तीन वर्षापासुन काम एच.पी.एम कपंनीचे सुरू आहे. या रस्त्याचे कामकाज तथा क्वालीटी कंट्रोल करण्यासाठी महाराष्ट्र राज्यमार्ग विकास महामंडळ यांच्याकडुन मुख्याधिकारी म्हणुन रवि कुमार यांची नियुक्ती केली . मात्र मुख्याधिकारी रवि कुमार यांच्या ढिसाळ कारभारामुळे राष्ट्रीय महार्गास मस्साजोग , केज, लोखंडी सावरगाव , आमदार निवास , अंबाजोगाई बायपास , धायगुडा पिपंळा व त्याच्या पुढे जागोजागी रस्ता खचत आहे तर मोठ – मोठ्या भेगा पडत आहेत . विशेष म्हणजे या सर्व रस्त्याचे गुणवत्ता (क्वालीटी कंट्रोल ) तपासुन बिले काढण्याची जिम्मेदारी हि रवि कुमार यांच्याकडे होती.
जर रस्त्याची गुणवत्ता चांगली असती तर सिमेंटचे रस्ते खचले किवां त्यास भेगा ,तडे गेले नसते. परंतु रवि कुमार यांच्या ढिसाळ कारभारामुळे गुत्तेदारांची करोडो रुपयांची बिलेही निघत आहेत व रस्त्याही खचत आहे. त्याबरोबरच संध्याच्या स्थितीत राष्ट्रीय माहामार्गाच्या रस्त्यालगत येणाऱ्या गावांनकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामे युद्धपातळीवर सुरु असुन त्यामध्येही मोठ्या प्रमाणात कामे आबड – धोबड तथा निकृष्ट दर्जाची होत असुन या वरती देखील मुख्याधिकारी रवि कुमार यांचे कसल्याही प्रकारचे लक्ष नसल्यामुळे शासनाचा हजारो कोटीच्यां विकास कामांसाठी दिलेला विकास निधी गुत्तेदारांच्या खिशात जात असतानाच्या बातम्या विविध वृत्तपत्रामधुन प्रकाशीत झाल्या व होत आसल्यामुळे मुख्याधिकारी रवि कुमार यांनी आंबाजोगाई येथे असलेले कार्यालयास कुलूप लावुन पळ काढला आहे. सध्या या रस्त्याचे काम एचपीएम कंपनी करत असुन अधिकारी असताना आबडधोबड कामे केली होती तर अधिकारी नसताना कामे कसे होत असतील याची सर्वत्र चर्चा सुरु आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!