वादळवार्ता- केज
बळीराजा कालही संकटात आणी आजही
या बाबत सविस्तर वृत्त असे कि बळीराजाने मोठ्या मेहनतीने खरीप पिकांचे पिक घेतले होते. त्यामध्ये प्रामुख्याने बाजरी , सोयाबीन , तुर, कापुस आदि पिकांचा समावेश होता. पिकांच्या जीवावर तो भविष्याचा वेध घेणार होता आपल्या कुटुंबाला आधार देणार होता. मुलांचे शिक्षण इतर बाबी पूर्ण करणार होता . पिकांची लागवड करुन पाउसाची वाट बघत एक – एक स्वप्न साकार करण्याची वाट पाहात होता. काळ्या मातीमध्ये हिरवेगार पिकांची काळजी घेत लहानाचे मोठे करत होता. परंतु पाउसा आभावी हिरवेगार दिसणारी पिके करपू लागली आणी हळुहळु माना टाकु लागली . पिके करपत होती त्याच पद्धतीने शेतकर्यांचे मन देखील उदास झाले. आणी सारे व्हत्याचे नव्हते झाले.
आज सकाळपासूनच वरुण राज्याने सर्व रानमाळ उदास – भकास झाल्यावर दमदार हजेरी लावली खरं पण त्यास येण्यास बराच उशीर झाला .पिके करपून गेली आहेत. या पाउसामुळे कांही काळासाठी ले हिरवेगार होतील परंतु ते पिकतील याचा काडीमात्र भरवसा नाही हे तितकेच खरे.
प्रशासनाने या शेतकरी वर्गाला अनुदान व विमा मिळावा यासाठी विविध पक्षांनी अंदोलने उभी केली निवेदने दिली शेतकर्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
या बाबींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जो बजीराजा संकटात सापडला आहे त्याला तात्काळ आधार द्यावा कारण तो उध्वस्त झाला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!