आपला बीड जिल्हाआपले केजविशेष

वाहन चोरी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर !

ऐका हो ऐका ssss दुचाकी चोरट्यांना आळा घालण्यासाठी दक्षता घ्या !

दुचाकी चोऱ्या रोखण्यासाठी पोलीसांनी केली ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असल्या कारणाने वाहनधारकाने आता काळजी घेण्यासाठी आणि वाहनाच्या सुरक्षेसाठी केज पोलीसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती सुरू केली आहे. वाहनधारकाने त्याला प्रतिसाद देण्याची आवाहनही केली आहे.

काही दिवसा पासून चोरट्यांनी आता आपला मोर्चा दुचाकी चोरीकडे वळविला असून ठीकठिकाणी वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यासाठी केज पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी शहरात नागरिकांनी वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी आणि त्याला आळा घालण्यासाठी ध्वनीक्षेपकावरून जागृती सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी मुख्य रस्ते व प्रमुख चौका चौकात जाऊन वाहनधारक आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहनधारकाने त्यांचे वाहन पार्किंग करताना हँडल लॉक लावावे. तसेच जास्त वेळ वाहन उभे करून बाहेर जायचे असेल तर टायर लॉकचा वापर करावा. वाहने उभे करताना हमखास सीसीटीव्हीच्या निगराणी खाली उभी करण्याची काळजी घ्यावी. अशा चोऱ्या रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी केले. तसेच वाहनाचे आरसी बुक, वाहन चालविण्याचा परवाना आणि इतर कागदपत्रे हे देखील सोबत बाळगावीत. असे आवाहन केले आहे.

वाहन चोर आणि संशयित यांची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच वाहन चोरी रोखण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर असून वाहन चोरांच्या मागावर आहेत. त्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!