आपला बीड जिल्हाक्राईम

रेखाचित्रा आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज येथे सोन्याचा दागिन्याला पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका वृद्ध महिलेचे १ लाख १५ हजार रु. चे दागिने घेऊन चक्क त्या ऐवजी पुडीत खडे बांधून दिले होते. त्या प्रकरणातील संशयित आरोपींचे पोलिसांनी रेखाचित्र तयार केले असून ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

१७ फेब्रुवारी २०२२ रोजी केज येथील समर्थ नगर मध्ये जोशी यांच्या घराचे लोखंडी चॅनेल गेट उगडे असताना दोन अनोळखी इसमानी रजनीबाई अनंत जोशी या ७८ वर्ष वयाच्या महिलेस तुमचे सोन्याचे दागिने उजळून व पॉलिश करून देतो; असे म्हणून त्यांच्या कडील १ लाख १५ हजार रु. किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन व अडीच तोळे वजनाचे गंठन त्यांच्या कडून घेतले. दागिने उजळून दिल्या नंतर ते दागिने त्यांच्याकडे घेताच त्या ठकांनी हातचलाखी करीत त्याची अदलाबदल केली आणि एका पुडीत बांधून त्यांच्या हातात दिली. ते दोघे अनोळखी इसम घरा बाहेर गेल्या नंतर रजनीबाई जोशी यांनी ती पुडी उघडून पहिली असता त्यात सोन्याचे दागिन्यांच्या वजना एवढे खडे असल्याचे निदर्शनास आले.

रजनीबाई जोशी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी केज पोलीस ठाण्यात दि. १७ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे. त्या नुसार केज पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.र.नं. ४३/२०२२ भा.दं.वि. ३८० व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि शमीम पाशा हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान तपासला अधिक गती मिळून त्या ठकांचा तपास घेण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी रेखाचित्र तयार केले आहे. त्या आधारे रेखाचित्रात दिसणाऱ्या व्यक्तीशी मिळता जुळते कोणी असेल; तर त्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, तपासी अंमलदार दिलीप गित्ते आणि शमीम पाशा यांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!