वादळ © वार्ता
स्पर्धा परीक्षा हा विषय केंद्रस्थानी ठेवून यथावकाश हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. यातील लालदिव्याची गाडी हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एकंदरित यथावकाश या चित्रपटाची तरूणाईला उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यथावकाश हा शब्द प्रचलित आहे. त्या शब्दाचा अर्थ होतो कालांतराने. स्पर्धा परीक्षेचा निकाल कधी लागेल. यथावकाश जाहिरात कधी येईल. यथावकाश. यथावकाश लागणाऱ्या निकालामुळे आणि यथावकाश निघणाऱ्या जाहिरातीमुळे कित्येक विद्यार्थ्यांचं आयुष्य कठीण होऊन बसलं आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला येणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात, त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असते. परंतु लाल दिव्याच्या गाडीचा किंवा सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात.
अशाच काही विद्यार्थ्यांची गोष्ट स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिळून यथावकाश या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यथावकाश या चित्रपटात काम करणारा प्रत्येक कलाकार हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावभावना या प्रत्येक कलाकाराने भोगलेल्या आहेत. त्याच भावभावना आता ते रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्पर्धा परीक्षेमधून तहसीलदार झालेल्या अविनाश शेंबटवाड यांनी केले आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचलित असलेले मराठी व्हायरल फिव्हरचे जीवन आघाव या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. स्पर्धा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पद प्राप्त केलेल्या सायली सोळंके या सुद्धा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित वेगळ्या धाटणीचा चित्रपट करण्याचा हा मराठीतील पहिलाच प्रयोग असावा. विशेष म्हणजे चित्रपटाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन यथावकाश हा चित्रपट तयार केला आहे. त्यामुळे या चित्रपटाची तरुणाईला प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटांमधील लाल दिव्याची गाडी हे गाणे नुकतेच मराठी व्हायरल फिव्हर या यूट्यूब चेनलवर प्रसारित झाले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्ने, भावभावनांची उकल, परिस्थिती आणि एकंदरीत आयुष्य या केवळ साडेतीन मिनिटाच्या गाण्यामधून मांडण्याचा वेगळा प्रयत्न संपूर्ण टीमने केला आहे. या गाण्याला दोन दिवसांत दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात हे गाणे मोठ्या प्रमाणामध्ये शेअर होत आहे. यथावकाश हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची दुसरी वास्तववादी बाजू देखील हा चित्रपट समाजासमोर मांडेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!