प्रभाग ११ च्या विकासासाठी नगरसेवीका अंदोलनाऱ्या पवित्र्यात
वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
केज नगरपंचायतचा अजब-गजब कारभार सध्या पहावयास मिळत आहे. जर संवेधानिक लोकप्रतिनिधीलाच न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय ? याचीच चर्चा सध्या केजभर पहायला मिळत आहे.
सविस्तर वृत्त असे कि केज नगरपंचायत च्या प्रभाग क्रमाक 11 च्या नगरसेविका इनामदार तरमिमबेगम गजमफर यांना प्रभागामधुन मोठ्या मताधिक्याने निवडुन दिलेले आहे. प्रभागामधील नागरीकांच्या समस्या ज्या आहेत त्या जानुन घेऊन वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनास निदर्शनास आणून दिल्या आहेत .
मात्र प्रभाग क्रमांक ११ मधील समस्या वारंवार प्रशासनास सांगुन देखील त्या समस्या सोडवण्यास डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास येताच लोकशाही मार्गाने तक्रार निवेदन प्रशासनास दिले आहे .
सदरील निवेदनात प्रभागामधील बोअरवेल तात्काळ दुरुस्त कराव्या तसेच धनेगाव धरण भरलेले असताना पाणीपुरवठा पंधरा-वीस दिवसांनी न करता वेळेवर करावा आणी घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर तीन महिन्यानंतरही का सोडले किंवा दिले नाही तसेच ऑनलाईन, ऑफलाई टेंडर कोणकोणते सोडले आहे आणी महत्त्वाचे म्हणजे जनरल फंडातुन निधी कोठे कशासाठी खर्च केला यांची माहिती लेखी स्वरूपात तात्काळ द्यावी . यासह अन्य मागण्याचे निवेदन केज नगरपंचायत च्या नगरसेविका इनामदार तरमिमबेगम गजमफर यांनी केज नगरपंचायत चे मुख्याधिकारी हजारे यांना दिले आहे. यावरून हेच सिद्ध होते कि केज नगरपंचायतचा कारभार हा संवेधानिक पद्धतीने होत नसुन अंसविधानिक पद्धतीने होत आहे.
१०० दिवसांचा हाच का विकास ? जर नगरसेविकेलाच न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्याचे काय ? केज नगरपंचायत चा कारभार लोकशाही मार्गाने होतोय कि हुकुमशाही ? केज नगरपंचायतचे नवनिर्वाचीत कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी केज नगरपंचायत चा कारभार सुधारतील का ? यासह अन्य प्रश्नांची चर्चा केज शहरामध्ये होतं आहे.