वादळवार्ता – गौतम बचुटे
सायं दैनिक रणाझुंजारचे केज तालुका प्रतिनिधी पत्रकार महादेव गायकवाड यांचे वडील दशरथ गायकवाड वय (८८ वर्ष) यांचे आज दि. १० मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
केज येथील सायं दैनिक रणाझुंजारचे केज तालुका प्रतिनिधी महादेव गायकवाड यांचे वडील दशरथ गायकवाड हे एक लोक कलावंत आणि त्या काळातील जनावरांचे प्रसिद्ध व्यापारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
दशरथ गायकवाड यांचे दि. १० मे रोजी सकाळी ७:३० वा. च्या सुमारास देवगाव येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८८ वर्ष होते.
त्यांच्या पार्थिवावर देवगाव येथील सार्वजनिक स्मशानभूमीत दुपारी ३:०० वा. बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
गायकवाड परिवाराच्या दुःखात केज तालुक्यातील सर्व पत्रकार सहभागी असून त्यांना पत्रकारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!