वादळवार्ता – गौतम बचुटे
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत इस्थळ येथे झेंडे लावण्या वरून दोन गटात मारामारी आणि झोंबा झोंबी झाली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली.
या बाबतची माहिती अशी की, दि.१० ऑगस्ट रोजी केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इस्थळ ता केज येथील जिल्हा परिषद शाळेचे समोरील मोकळे पटांगणात रोडवर दोन समाजातील काही लोक हे त्यांचे वेगवेगळे झेंडे लावत आहेत आणि त्यामुळे गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे अशी माहीती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि पोलीस जमादार डोंगरे, जमादार मुंडे, कॉन्स्टेबल बाळासाहेब घोरपडे, कॉन्स्टेबल म्हेत्रे यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी दोन समाजाचे वेगवेगळे झेंडे लावण्याचे दोन्ही गट एकमेकांना शिवीगाळ करीत होते. तसेच ते आपसात मध्ये झटापट करुन मारामारी करत होते. पोलिसांना पाहातच पळून गेले. त्या नंतर दि. ११ ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी स्वतः सरकार पक्षा तर्फे फिर्यादी होऊन मनोज प्रकाश शिंदे, रवि नरसिंग भिसे, अविनाश बापूराव भालेकर, श्रीकीसन शंकर भालेकर, गोविंद व्यंकटराव शिंदे, पंढरीनाथ विकास तोकले, अनिकेत सतीश शिंदे, मेघराज रामभाऊ शिंदे, बापू फुलचंद शिंदे, अभिषेक धनंजय शिंदे, सागर अर्जुन खोत, गणेश काळे, शंकर कांबळे, दामोधर कांबळे, महादेव दामोधर कांबळे, आकाश दिनेश कांबळे, संजय सुनील कांबळे, उध्दव भैरव कांबळे, दत्ता रमेश कांबळे, यश खंडु कांबळे, सचिन विकास कांबळे, विकास कांबळे, स्वप्निल उध्दव कांबळे आणि निखील उध्दव कांबळे या २४ जणासह इतर १० ते ११ जणांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु र नं १७८/२०२३ भा दं वि १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार रामधन डोईफोडे हे अधिक तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!