वादळवार्ता – केज
केज शहरातील नागरीकांची सुरुवातीपासुनच पाण्यासाठी दयनीय अवस्था आहे. सुरुवातीच्या काळात ग्रामपंचायत अस्तित्वात असताना सन १९८९ सालामध्ये पाण्याची बिकट अवस्था पाहुन रणजितसिंह पाटील यांनी केज शहरामध्ये मोठे अंदोलन छेडले या अंदोलनाने कांहि दिवसातच मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण केले होते. यामध्ये महाराष्ट्रात पाण्यासाठी पहिल्यांदाच ३ बसेस फोडल्या गेल्या फक्त पाण्यासाठीचा संघर्ष करणाऱ्या तब्बल १५ मुख्य व कांही इतर जनांनवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच काळात अशोकराव पाटील हे सांस्कृतिक व क्रिडा राज्यमंत्री होते. त्यांनी या अंदोलनाची दखल घेऊन पाठपुरावा केला. सन १९९० साली या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी येऊन काम सुरु झाले. सन १९९३ सालामध्ये प्रत्यक्ष या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन केज विधानसभेच्या आमदार स्व. विमलताई मुंदडा यांच्या हस्ते झाले आणी केज शहरातील नागरीकांचा पाण्याचा प्रश्न कांही वर्षासाठी मिटला गेला.
आज घडीला मांजरा म्हणजेच धनेगावच्या धरणाच्या माध्यमातुन लातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजशहरसह १२ गावांना पाणीपुरवठा मांजरा धरणातून होतो. आज केज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेला ३० वर्ष झाली असुन हि यंत्रणा मोठ्या प्रमाणात आजारी पडली आहे. पाण्याच्या टाकीमध्ये शहरातील पाणीपुरवठा करणारा मेन वॉल खराब झाला असुन त्यामधुन सतत पाणी विसर्जीत होत आहे.तर टाकीमधील १२ एच.पी. च्या व ५ एच.पी च्या असणाऱ्या मोटर खराब झाल्या आहेत. फिल्टर टाकी मधील फिल्टर व्यवस्था व व्यवस्थापन ढिसाळ पद्धतीने होत असल्यामुळे पाणी फिल्टर न करताच १५ ते २० दिवसांनी केज शहराला सोडले जाते. तर जागोजागी पाईपलाईन फुटत असल्यामुळे पाईपलाईन दुरुस्त करण्यातच कर्मचारी व्यस्त असतात तसेच केज शहरातील शिक्षक कॉलनी , क्रांतीनगर , प्रशांत नगर , समता नगर , माधव नगर यासह अनेक भागामधील नागरीक नविन नळ कनेक्शनची वाट पाहत आहेत. अस्वच्छ पाण्यामुळे केज शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 
पाण्यासाठीचा मोठा संघर्ष उभा करून आणलेली योजना आज घडीला आजारी पडली आहे. याला जबाबदार कोण ?
सत्ताधारी या आजारी पडलेल्या यंत्रणेकडे लक्ष देतील का ? केज शहरातील नागरीकानं कडुन सक्तीने पाणीपट्टी वसुली केली जाते तर दर ४ दिवसांनी नळाला पाणी सुटेल का ? ज्या परिवर्तनाचे गाजर दाखवून सत्ताधारी सत्तेत बसले ते परिवर्तन करतील का ? आदि प्रश्न केज शहरातील जनतेला पडले आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!