वादळवार्ता – केज
लहान वयातच मुलांवरती संस्कार केले जातात त्यांना आई – वडीलांच्या तथा शिक्षकांच्या,माध्यमातून महापुरुषांच्या कार्याविषयी माहिती दिली जाते त्याच विचारांची प्रेरणा घेऊन ते आपले आयुष्य घडवितात.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज शहरातील भव्य – दिव्य असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा चौक , कोणत्याही सामाजीक , धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात या ठिकणी अभिवादन करूण होते .
आज राम नवमी च्या निमित्ताने लोंढे गल्ली ,हनुमान गल्ली येथील आशिष इगवे ,रोहन आवटी, आर्यन राऊत , श्रीकांत काळे , अथर्व राऊत , रवि राऊत , संदेश आगरकर आदि लहान – चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाची हातामध्ये झाडु , कपडा घेउन रखरखत्या उन्हांमध्ये पायांना चटके बसे पर्यंत अगोदर स्वच्छता केली त्यानंतर फुलांची पुष्पमाला अर्पण करूण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांचा जयघोष केला.
हे त्यांच लहान वयातील असणारे कार्य माणसाला महापुरुषांच्या विचारांचा जागर करावयास निश्चित सांगतात.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!