आपला बीड जिल्हाआपले केजविशेष

अजूनही प्रमाणिकपणा जिवंत ; सापडलेला मोबाईल केला परत 

 वादळवार्ता वार्तांकन – केज

एका वकील महाशयांनी त्यांना रस्त्यात सापडलेला मोबाईल एका पोलीस ठाण्यात जमा करून मूळ मालकाला परत केला.

याबाबतची माहिती अशी की केज येथील विधिज्ञ ॲड. रंजित खोडसे यांना गुरुवार दि. १२ जानेवारी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल कानडी रस्त्यावर पडलेला मिळून आला. ॲड. रंजित खोडसे त्यांनी तो मोबाईल दि. मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी केज पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे स्वाधीन केला. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी एका तासात सदर मोबाईल तपास करून मोबाईल मालकाचा शोध घेतला. सदर मोबाईल हा बाबासाहेब कांदे यांचा आहे आणि तो त्यांच्या मुलां कडून गहाळ झाला होता. सदर मोबाईल आणि त्याच्या मालकाची ओळख पटल्या नंतर; मोबाईल मालक बाबासाहेब कांदे आणि ॲड. रंजित खोडसे यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. केज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी तो मोबाईल बाबासाहेब कांदे यांच्या स्वाधीन केला. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, ॲड. रंजित खोडसे हे उपस्थित होते.

ॲड. रंजित खोडसे यांच्या या प्रामाणिकपणा सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी ॲड.रंजित खोडसे यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. तसेच ॲड. रंजित खोडसे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!