आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या कारने पादचाऱ्यास ठोकरले ; गुटख्याची गाडी जाग्यावर सोडुन पलायन

केज तालुक्यामध्ये अवैद्य धंद्याला ऊत

बेकायदेशीर रित्या गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका भरधाव कारने रस्त्याने पायी जाणाऱ्या पादचाऱ्यास धडक दिली.

वादळवार्ता वार्तांकन – केज

अपघात होताच गाडीचा ड्रायव्हर गुटखा भरलेली कार जागीच सोडून पळून गेला.

या बाबतची माहिती अशी की, रविवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ६:४५ वा. केज येथे केज धारूर रोडवरील साने गुरुजी विद्यालया जवळ एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने क्र. (एम एच-१२/ब-३२६२) रस्त्याने पायी चालत असलेल्या काशिनाथ राऊत वय ४० वर्ष याला धडक दिली. अपघाता नंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्या नंतर अपघातग्रस्त कार ही रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली. अपघाता नंतर अज्ञात कार चालक कार सोडून पळून गेला.

दरम्यान अपघाताची माहिती केज पोलिसांना मिळताच पोलीस नाईक उमेश आघाव, पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांनी शासकीय वाहनाने घटना स्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी काशिनाथ राऊत पेंटर यास उपचारासाठी दवाखान्यात पाठविल्या नंतर अपघातग्रस्त कारची तपासणी केली असता; अपघातग्रस्त कारमधून राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूची बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्या अपघातग्रस्त कारची पंचासमक्ष तपासणी केली. त्या कारमध्ये मधल्या सीटवर तंबाखूच्या पुड्याचे पोते आणि डिग्गीमध्ये केशरयुक्त बाबाजी पान मसाला गुटख्याची सहा पोते गुटखा असे १ लाख २५ हजार ९७० रु किंमतीचा गुटखा आढळून आला.

या प्रकरणी पोलीस नाईक उमेश आघाव यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५९४/२०२२ भा. दं. वि. २७२, २७३ आणि ३२८ नुसार गुन्हा दाखल करून गुटखा आणि कारसह ३ लाख २५ हजात ९७० रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

 

पंकज कुमावत प्रशिक्षणाला गेल्याने अवैद्य धंद्यावाल्यांची हिम्मत वाढली असल्याची चर्चा :- केज उपविभागाचे सिंघम सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे काही महिन्या पूर्वी प्रशिक्षणासाठी गेले असल्याने अवैद्य धंदे करणारांची हिम्मत वाढली असल्याने परिसरात अशा घटना घडत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!