कारवाई करा अन्यथा लवकरच वंचित बहुजन आघाडीचे तीव्र स्वरूपात धरणे आंदोलन व उपोषण
वादळवार्ता वार्तांकन – परळी वैजनाथ
आदर्श गाव पुरस्कार प्राप्त टोकवाडी येथे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले असून उदा दारू विक्री, मटका, जुगार व गुटखा या धंद्याने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये हातभट्टीची दारूविक्रेत्यांनी टोकवाडीतील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा चंगच बांधला आहे. गोरगरीब, मोलमजुरी करून दिवसभर काम करून आपल्या घरी जाण्याच्या ऐवजी ते सरळ दारूच्या व मटक्याच्या दुकानात जाऊन दारू पितात व मटका लावतात घरी जाऊन भांडणे करतात. दारू पिऊन पैसे उडवून घरी आल्यानंतर हे तळीराम आपल्या बायका मुलांना मारत आहेत.
तसेच हे दारू पिऊन रस्त्याने चालत असताना अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तसेच कमावलेले सर्व पैसे हे अवैध धंदेवाल्यांच्या घशात जात असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर अक्षरशः उपासमारीची वेळ येत आहे. वरील सर्व अवैद्य धंदे दिनांक 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत बंद करण्यात यावेत अन्यथा दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन उपोषण करण्याचा इशारा दिला आहे यामध्ये साहेबराव रोडे युवा जिल्हाउपाध्यक्ष बीड पूर्व वंचित बहुजन आघाडी, विष्णू मुंडे महासचिव राजू भुतके यांनी इशारा दिला आहे.