आंदोलनआपले केज

केज तालुक्यातील माजी सैनिकांनी सोमवारच्या रॅलीत सहभागी व्हावे

वादळवार्ता – केज

केज : माजी सैनिकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतर-मंतर वर देशातील माजी सैनिकांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केज शहरात सोमवार दि 3 एप्रिल 2023 रोजी माजी सैनिकांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी केज तालुका व परिसरातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांचे नातेवाईक, सेवारत सैनिकांचे नातेवाईक, हितचिंतक व समाजप्रेमी नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन केज तालुका संघर्ष माजी सैनिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष अजिमोद्दीन शेख-इनामदार, सचिव हनुमंत भोसले, उपाध्यक्ष राम प्रभू राऊत व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!