आठवडी बाजारामध्ये शेतकर्यानंकडुन पैसे घेणार्या सत्ताधाऱ्यांच्या महाविकासाचा प्रताप
वादळवार्ता – केज
मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात. या खेळांमध्ये क्रिकेट, फूटबॉल, उंचउडी, लंगडी, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रोवबॉल, पकडापकडी, आशा विविध खेळांचा समावेश होतो. यामुळे शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते. मात्र यासाठी खेळाचे मैदान हे मोठे आणी स्वच्छ असणे तितकेच गरजेचे असते यामुळे खेळाडूंचे आरोग्य चांगले रहाते . मात्र केज नगरपंचायत या खेळाडुंची अतिशय चेष्टा करत त्यांच्या आरोग्याशी व भविष्याशी खेळत आहे.
याबाबत वृत्त असे कि केज नगरपंचायत केज शहराचा महाविकास करायच्या जागी दिवसेंदिवस केज शहरातील विद्यार्थी , खेळाडू , नागरीकांना, शेतकर्यांना महासंकटात ढकलून त्यांची थट्टा करून त्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे केज शहराला मैदान नसणे आणी जे शहरातील मैदान आहे त्या मैदानावर शुक्रवारचा आठवडी बाजार भरतो या बाजारात केज शहरातील तथा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी येतात मात्र त्यांना बसण्याची जागा नसते ना शौचालयाची ना पाण्याची. या बाजारामुळे केज शहरातील खेळाडू सदरील मैदानावर खेळू शकत नाहीत . मात्र दुसर्या दिवासापासुन अनेक खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी तथा वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी एकत्र येतात परंतु केज नगरपंचायतीच्या सत्ताधार्यांचा नाकरतेपणा यावेळी स्पष्ट जानवतो तो म्हणजे बाजाराचे टेंडर न काढता शेतकरी वर्गाकडून प्रत्येकी २० रुपये घेतले जातात . मात्र दुसऱ्या दिवशी मैदानाची स्वच्छता करणे गरजेचे असताना स्वच्छता केली जात नाही याकडे ना सत्ताधार्याचे लक्ष ना प्रशासनाचे . यामुळे मात्र नाविलाजास्तव केज शहरातील खेळाडूना याच कचऱ्यांच्या मैदानावर आपले आरोग्य धोक्यात घालुन खेळ खेळावे लागत आहेत. भविष्यात या खेळाडू पैकी कोणी तालुका स्तरावर ,जिल्हास्तरावर , विभागीय स्तरावर , राष्ट्रीय स्तरावर जाणार आहेत. केज तालुक्याचे ,शहराचे नाव रोशन करणार आहेत. परंतु याचे केज नगरपंचायत प्रशासन वा सत्ताधाऱ्यांना कांही घेणे – देने नाही. ते फक्त पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत केज शहराचा आबड – धोबड विकास करण्यामध्ये.
मुख्याधिकारी गायकवाड साहेब तुम्ही प्रशासनामध्ये जिम्मेदार अधिकारी आहात हे खेळाडू विद्यार्थी भारताचे भविष्य आहेत यांच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी घेणे आपण आपले अद्य कर्तव्य समजले पाहिजे या करिता ठोस पाऊले उचलने गरजेचे आहे. केज शहरातील नागरिकांचा सत्ताधार्यावर नाही तर आपणावर विश्वास आहे. आपण कधी अँक्शन घेणार ? अशी जनतेत चर्चा सुरु आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!