आपला बीड जिल्हाकला

माजी मंत्री आ. धनंजय मुंडेंच्या हस्ते नाथरा येथे मराठी साहित्य संमेलनाचे होणार उद्‌घाटन

रत्नपारखी डॉ. एकनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी वैजनाथ पंचक्रोशीतील वाचकांना मिळणार साहित्यिक मेजवानी

श्रीनाथ मानव सेवा मंडळातर्फे ४ जानेवारी रोजी आयोजित केले जाणार सहावे मराठी साहित्य संमेलन

विविध पुरस्कारांचे केले जाणार वितरण

वादळवार्ता वार्तांकन – परळी वैज्यनाथ

श्रीनाथ मानव सेवा मंडळ यांच्या वतीने सहावे मराठी साहित्य संमेलन दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथ्रा येथे होणार आहे. रत्नपारखी डॉ. एकनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी वैजनाथ पंचक्रोशीतील वाचकांना साहित्यिक मेजवानी मिळणार आहे.

या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे या राहणार आहेत. तर युवा साहित्यिक, कवी दंगलकार डॉ. स्वप्नील चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील मान्यवर मसाप मराठवाड्याचे सदस्य दगडू लोमटे, ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब, जि. प. गटनेते अजय मुंडे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष मुंडे, सरपंच अभय मुंडे तथा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती विशेष व्यक्तिमत्त्वांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!