आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी व दर्पण दिनानिमित्त केज येथे सर्व पत्रकार संघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज : श्री संत भगवानबाबा महाराज व केज पत्रकारांच्या वतीने रविवारी येथील हनुमान मंदिर, वकिलवाडी येथे इमर्जन्सी रक्तदान शिबिर पार पडले.

या शिबिराचे उदघाटन केज चे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिबिराचे समन्वयक हनुमंत भोसले,  अशोक सोनवणे, धनंजय देशमुख, धनंजय कुलकर्णी, विजयराज आरकडे, प्रकाश मुंडे,  अभय कुलकर्णी, दशरथ चवरे , अजय भांगे , हनुमंत सौदागर, रणजित घाडगे, दत्तात्रय मुजमुले , मुबशीर खतीब , अनिल वैरागे , चंद्रकांत पाटील, संत भगवान बाबा महाराज पुण्यतिथीचे पदाधिकारी विलास सोनवणे, विजय वनवे, अक्षय गीते, विजय अंडील व सुलेमान काजी यांच्यासह नागिरीक मोठ्या संख्येने सहभागी होते.

सध्या अंबेजोगाईच्या शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासला असल्याने रुग्णांना रक्तपेढीत रक्त वेळेवर उपलब्ध होत नसल्याने या रक्तपेढीसाठी इमर्जन्सी रक्तदान शिबिराचे आयोजन येथील संत भगवानबाबा पुण्यतिथी समितीचे विजय वनवे , विलास सोनवणे , अक्षय गिते , राजकुमार शिंदे , सुलेमान काजी , विजय अंडिल , सावता रासवे याच्या सह केज पत्रकारांच्या वतीने या शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरात रत्नाकर साहेबराव नेहरकर, रणजित तात्याराव घाडगे, पांडुरंग विश्वम्भर जाधव, धनंजय भगवानराव कुलकर्णी, अशोक रावसाहेब सोनवणे, महेश रामहरी तांबडे, सुलेमान इलियाज काजी, गौतम लिंबाजी बचुटे, रामराजे वसंतराव साखरे, शिवराज भालचंद्र मूथळे, अशोक मधुकर काळे, ऍड भागवत निवृत्ती ढाकणे, सोमनाथ बजरंग नेहरकर आणि भाऊसाहेब अशोकराव बनसोडे इत्यादींनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने समन्वयक हनुमंत भोसले यांनी अभिनंदन केले.

या प्रसंगी भविष्यात केज शहर व तालुक्यात रक्तदान चळवळ अधिक गतिमान करणार असल्याचेही हनुमंत भोसले यांनी सांगितले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!