आपले केजक्राईम

१ रुपयाला मिळतो ९० रुपयांचा मोह ; ओपन ते क्लोजपर्यंत पाहिली जाते वाट, लागते मात्र लावणाऱ्यांचीच वाट !

केज मध्ये गैरकायदेशीर मटका व्यवसाय फोफावतोय खुलेआम

केज । प्रतिनिधी

केज तालुक्यात मटक्याचा सट्टा हा सर्रास व खुलेआम चालणारा व्यवसाय बनला आहे. “१ रुपयाला ८० रुपये मिळतात” या आमिषाने तरुण पिढीला आकर्षित करून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. गावोगावी टपऱ्या, चहा गाड्या, हॉटेल, भाजी मंडई, अशा ठिकाणी मटक्याचे आकडे खुलेआम फिरताना दिसतात.”ओपन ते क्लोजपर्यंत” सट्टा लावणाऱ्यांची दिवसभर धावपळ सुरू असते. काही जण यातून पैसे कमवतात, पण अधिकतरांचे फसलेले भविष्य आणि कर्जबाजारी संसार मात्र कुणाच्याही लक्षात राहत नाहीत.हे सर्व प्रकार ‘बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ॲक्ट, १८८७’ (जुगार प्रतिबंधक कायदा १८८७) अंतर्गत बेकायदेशीर असून, त्यानुसार जुगार अड्डा चालवणे, जुगार खेळणे किंवा जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणे हे गुन्हे आहेत.या कायद्यातील कलम ४ नुसार जुगार खेळताना आढळल्यास संबंधित व्यक्तीला जुर्माना व शिक्षेची तरतूद आहे. कलम ५ अंतर्गत ज्या ठिकाणी जुगार खेळवला जातो, त्या जागेचा मालक व चालक यांच्यावर देखील कारवाई करता येते.कलम १२ नुसार पोलीस अधिकार्यांना वारंटशिवाय संशयित जागेवर छापा टाकण्याचा अधिकार आहे.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा सट्टा उघडपणे सुरू असूनही पोलीस प्रशासनाकडून फारशी कारवाई होताना दिसत नाही. केवळ वरवरचे छापे व कारवाईचे ढोंग करून पुन्हा सट्टा सुरू होतो, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. तालुका पातळीवर सट्ट्याचे म्होरक्या, एजंट व स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्ती यांच्यातील संगनमतामुळे हा सट्टा अधिकच बळावत आहे. त्यामुळे तरुणांना शिक्षण, रोजगाराच्या मार्गावरून भरकटवून हानिकारक प्रवृत्तीकडे वळवले जात आहे.

या गंभीर परिस्थितीत पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत मुख्य सूत्रधारांना अटक करावी, तसेच या गैरकायदेशीर सट्ट्यावर आळा घालण्यासाठी स्थायी गुप्तचर पथक कार्यरत करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. मात्र कायद्याचा बडगा केव्हा उगारणार, हे येणारा काळच ठरवेल तोपर्यंत मात्र अनेकांच्या स्वप्नांची राख होत राहणार का ? असा सवालही सर्वसामान्य नागरीकांत पडला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!