ब्रेकिंग न्युज

बाह्यमूल्यमापनमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणार :बाजीराव देशमुख शिक्षणविस्तारअधिकारी

वादळ वार्ता प्रतिनिधी – सांगली – शिराळा

सदगुरु आश्रम शाळा शिराळा येथे प्रथम व सांगली जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बाह्यमूल्यमापन प्रशिक्षण संपन्न झाले.

या प्रशिक्षण अंतर्गत विध्यार्थ्यांचे भाषा, गणित, इंग्रजी या विषयांची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर विध्यार्थी ज्या घटकामध्ये अभ्यासामध्ये मागे आहे त्यावरती विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर प्रशिक्षण तालुक्यातील सर्व शिक्षकांना देण्यात आले.

या प्रशिक्षणास शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर प्रशिक्षणास शिक्षणविस्तार अधिकारी विष्णू दळवी, बाजीराव देशमुख यांनी भेट दिली. या प्रसंगी बाजीराव देशमुख म्हणाले, बाह्यमूल्यमापन मुळे विध्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर निश्चित करता येणार आहे त्यामुळे विध्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यास योग्य दिशा मिळणार आहे.

या प्रशिक्षणास प्रथम संस्थेचे मोहन पिंगळा,वंदना पठारे यांनी मार्गदशन केले.प्रशिक्षण दोन टप्यात घेऊन तालुक्यातील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.परीक्षा घेतलेनंतर सदर गुण जि. पि. ऍप वरती संकलित केले जाणार आहे.मधुकर डवरी,प्रदीप कदम,पांडुरंग गायकवाड अविनाश निकम,बिंदिया निकम,,विकास हाके,सुजाता तिवले,वीरेंद्र सकटे यांचे सहकार्य लाभले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!