आपला बीड जिल्हा

केज तालुक्यात वीज पडून शेतकरी मृत्युमुखी

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यातील गप्पेवाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या बाबतची माहिती अशी की, गप्पेवाडी ता. केज येथील ज्ञानोबा निवृत्ती केदार वय (६५ वर्षे) हे रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:०० वा. च्या सुमारास शेतातून जनावरे घेऊन घराकडे घेऊन येत असताना विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी अचानक ज्ञानोबा निवृत्ती केदार वय (६५ वर्षे) यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे नातेवाईक श्रीमंत विठ्ठल केदार यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती वरून फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १७४ नुसार आकस्मिक मृत्यू २५६/२०२२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

या प्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक बाळराजे सोनवणे हे करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!