आपला बीड जिल्हाशेतकरी

50 फुटावरून 75 हजार रुपयांचा बैल पडला दरीत गरीब शेतकर्‍याचे अन् त्याच्या बैलाचे हाल.

वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे

शेतकरीराजाचा खरा जोडीदार त्याच्या शेतामध्ये राब राब राबणारा म्हणून बैलांची ओळख आहे . मोठ्या कष्टाने शेतकरी राजा बैलाची जोपासणी करतो त्याला चांगलं खाऊ घालतो त्याला मोठं करतो . त्याची देखभाल करतो. मात्र बैलावरती वेळ आल्यावर शेतकरी राजा देखील मागे नसतो.

 

सविस्तर वृत्त असे की धारूर तालुक्यातील काटेवाडी गावामध्ये शेतकरी बालासाहेब एकनाथ मुंडे यांच्या मालकी हक्काचा 75 हजार रुपयांचा बैल गावामध्येच असलेल्या एका खोल दरीमध्ये 30 अक्टोंबर रोजी सायं 5 वाजता पाय घसरून खालती पडला आहे.

 

उंचावरून पडल्यामुळे त्याच्या पाठीमागच्या पायाकडील भागांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्यामुळे त्याला जागेवरून उठता येत नाही. त्याबरोबरच उंचावरून पडलेल्या मुळे त्याला वरती चढता येत नाही .

आशा परिस्थीती मध्ये शेतकरी आपल्या कुटुबाला घेऊन बैलासोबात रात्रभर जागता पाहारा दिला मात्र स्थानिक प्रशासनाच्या वतीने कोणीही शेतकर्‍याची मदत करण्यासाठी पुढे आले नाही .

शेतकरी राजा ईकडे तिकडे पळत त्याने स्थानिकचे पशुवैद्यकीय डॉक्टर यांना बैल ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी नेऊन बैलाचा विलाज करत आहेत.

शेतकरी राजाचा जोडीदार दरीमध्ये अडकुन पडला आहे येईल का कोणी बळीराजाच्या जोडीदारास वाचवण्या करिता ? मदत करण्याचे शेतकर्‍याचे आवाहन केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!