
वादळवार्ता – केज
केज शहरामध्ये तथा तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासट वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस आचानक दुपारी झाला .त्या वादळी वार्याच्या पाउसामध्ये पंचायत समितीच्या मैदानात असणारे महाकाय निलगिरीचे झाड प्रकाश कसबे यांच्या घरावर कोसळुन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाड मोठ्या आवाजाने कोसळताच कसबे परिवार बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला असला तरी घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन महसुल विभागामार्फत पंचनामा लवकरच होऊन शासकीय मदत तात्काळ मिळेल असे केज महसुलचे नायब तहसिलदार लक्ष्मण धस यांनी वादळ वार्ताशी दुरध्वनी वरुण बोलताना सांगीतले आहे .



