आपला बीड जिल्हाआपले केजनिवडणुक

स्थापनेपासुन एक हाती असणारी कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रांमपचायतच्या सर्व जागा जिंकुन बजरंग सोनवणेचा शिरकाव

बजरंग सोनवणे यांच्या एंट्रीमुळे निवडणुकीला आले मोठे स्वरूप

वादळवार्ताकेज

केजची कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणुक केज तालुक्यातील जनतेच्या चांगलीच चर्चेत राहिली त्यांचे कारणही तसेच आहे ते म्हणजे बजरंग सोनवणेची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एंट्री आणी नंतर या निवडणुकीला आलेले मोठे स्वरूप…निश्चितच या एंट्रीने चांगल्या चांगल्या दिग्गजांना घाम फोडला हे नाकारता येणार नाही.

केज कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा आज निकाल बाहेर आला. त्यामध्ये बळीराजा परिवर्तन पॅनलने पुढे जिल्हा परिषद , पंचायत समीतीच्या निवडणुका करिता महत्वाच्या असणार्‍या ग्रामपंचायत मतदार संघातील एकुण चार जागांवरती दणदणीत विजय मिळवला आहे. तर ३ जागा बिनविरोध काढुन ११ जागावरती विजय मिळवत एकुण १४ जांगा जिंकुन शेतकरी विकास पॅनलने कृषि उत्त्पन बाजार समितीच्या स्थापनेपासुनची सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले असले तरी बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील ग्रांमपचायत आपल्या ताब्यात आहेत हेच यावेळी सिद्ध केले अशी निकालानंतर केज तालुक्यातील जनतेत चर्चा आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!