वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
सहशिक्षक असलेल्या राजकुमार गित्ते यांचे चिरंजीव रितेश गित्ते यांनी राष्ट्रीय पात्रता व चाचणी परीक्षेत मिळविलेल्या यशा बद्दल पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे आणि आ. नमिताताई मुंदडा यांनी सत्कार केला.
छ्त्रपती शिक्षण संस्था आडस संचलित शंकर विद्यालय साळेगाव येथील विज्ञान विषयाचे सहशिक्षक राजकुमार गित्ते यांचे चिरंजीव रितेश गित्ते याने सन २०२२ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी परीक्षा अर्थात नीट परीक्षेत ७२० पैकी ५५१ गुण प्राप्त करून वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरला आहे. त्याच्या या यशा बद्दल चि. रितेश गित्ते, त्याचे पालक राजकुमार गित्ते व आई सौ. गित्ते यांचा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री पंकजाताई मुंडे, खा. डॉ प्रितमताई मुंडे, आ नमिताताई मुंदडा आणि जेष्ठ नेते नदंकिशोर मुंदडा यांनी त्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करीत सत्कार केला.
या यशाबद्दल रितेश गित्ते यांचे छत्रपती शिक्षण संस्थेचे रमेश आडसकर, मुख्याध्यापक प्रवीण देशमुख, सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, युवराज गित्ते, दत्तात्रय धस, बाळासाहेब धस, अकबर पटेल तसेच शंकरविद्यालयातील सर्व शिक्षक-शिकेत्तर कर्मचारी या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आहे.