
भ्रष्टाचार कसा आणि कोणत्या स्वरूपाची शक्कल लावून केला जातो हे पहायचे असेल तर या गावाला भेट जरूर द्यावी गावगाड्याची परिस्थिती पहायला मिळेल. मुख्य म्हणजे दळवळणाची व्यवस्था जर व्यवस्थित नसेल तर गावगाडयाचा विकास होणे अशक्य आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे केज तालुक्यातील मौजे बोरगांव (बु.) येथील पानंद रस्त्याचे काम न करताच लाखो रुपयाची बोगस बिल उचलण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गव्हाणे यांनी केज पंचायत समिती तथा तहसील कार्यालय केज या ठिकाणी केली आहे या तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की मौजे बोरगांव (बु.) ता. केज येथील बोरगांव (बु.) ते आधडी शिव पांधन रस्त्याचे काम ७ वर्षापूर्वीच पुर्ण झालेले असतांना सदरील रस्त्यावर नंतर गांवकऱ्यांनी लोकसहभाग तयार करुन सदरील रस्त्यावरील पडलेले खड्डे व रस्ता दुरुस्ती सन २०२३ ला करण्यात आलेले असतांना बोगरंव (बु.) ग्रामपंचायतने सदरील केलेला रस्ताच बोरगांव (बु.) ते बोरगांव आथर्डी शिव पांधन रस्ता भाग- १ वर्क कोड (१८१८००५०१६/ आरसी/१२३४७५२७९४ ) व बोरगांव (बु.) ते बोरगांव आथर्डी शिव पाधंन रस्ता भाग-२ वर्क कोड (१८१८००५०१६/आरसी/१२३४७५२७९८ ) अशा प्रकारे काम मंजुर करुन सदरील रस्त्यावर कसल्याही प्रकारचे काम न करता व चालु असलेली आचार संहितेचा गैरफायदा घेऊन आचार संहितेतच रेकॉर्डतील काम चालु करुन सदरील रस्त्याचे लाखो रुपयांचे बोगस बील उचलण्यात आलेले असून अजूनही सदरील रस्त्यावर बोगस बील उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी साहेबांनी सदरील रस्त्याचे काम तात्काळ बंद करुन सदरील रस्त्याची स्थळ पाहणी पंचनामा करुन सदरील दोषी विरुध्द तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. सध्या आचारसंहिता चालु असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करता येत नाही याचाच गैरफायदा ग्रामपंचायत बोरगांव (बु.) घेत असून आपणास हे पत्र प्राप्त होताच सदरील काम तात्काळ थांबविण्यात यावे व शासकिय निधीचा होणारा अपहार तात्काळ थांबवावा अन्यथा आचार संहिता संपल्यानंतर अमरण उपोषण करण्यात येईल. याची गांभीर्यपूर्वक आपण दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!