आपला बीड जिल्हाआपले केजविशेष

शिक्षकांनी स्वखर्चातुन वर्गात प्रोजेक्टर बसवून सुरू केले डिजिटल शिक्षण

सेवा निवृत्त पाच मुख्याध्यापकांच्या हस्ते उपस्थितीत झाला लोकार्पण सोहळा

वादळवार्ता – गौतम बचुटे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक दर्जेदार शिक्षण मिळावे आणि दृक श्राव्य माध्यमातून विषयाचे दृढीकरण व्हावे यासाठी केज तालुक्यातील शंकर साळेगांव येथील शिक्षकांनी स्वखर्चाने शाळेत प्रोजेक्टर बसवून डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शंकर विद्यालय साळेगांव येथील मुख्याद्यापक व सहशिक्षक राजकुमार गित्ते यांच्या संकल्पनेतून या शाळेतील विद्यार्थ्यांना दृक श्राव्य माध्यमातून विविध विषयांचे अध्यापन आणि अध्ययन करीत असताना संल्पपनेचे दृढीकरण होऊन विषयाचे सुलभीकरण व्हावे तसेच जागतिक घडामोडी आणि इतर विषयांचे सखोल आकलन व्हावे म्हणून शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चाने डिजिटल क्लासरूम तयार केली त्यासाठी मुख्याध्यापक प्रवीण देशमुख यांनी इन्व्हर्टर बसवून दिले तर राजकुमार गित्ते सर यांनी प्रोजेक्टर भेट दिले आहे. देशमुख सर आणि गित्ते सरांचेदोघांचेही मुले वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तसेच इतर शिक्षकांनी देखील या डिजिटल क्लासरूम साठी आर्थिक भार उचलला आहे.

दि. १२ एप्रिल रोजी या डिजिटल क्लासरूमचा लोकार्पण सोहळा या शाळेचे सेवा निवृत्त मस्के सर, गदळे जाधव सर, चव्हाण सर, गद ळे सर आणि राऊत सर या पाच सेवानिवृत्त मुख्याद्यापक यांच्या हस्ते आणि उपसरपंच गणेश गालफाडे, लेखा परीक्षक बाबासाहेब गित्ते, ग्रामपंचायत सदस्य रमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या प्रसंगी गदळे सर, राऊत सर, चव्हाण सर, मस्के सर, गौतम बचुटे, बाबासाहेब गित्ते यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याद्यापक प्रविण देशमुख यांनी केले तर आभार केंद्रे सर यांनी आणि सूत्रसंचलन राजकुमार गित्ते यांनी केले.

या कार्यक्रमाला बिभीषण गित्ते, सय्यद अकबर सर, मेहेत्रे सर, गालफाडे सर, म्हेत्रे जी एच, तांबरे एस जी, नखाते एच आर, घोडके एस बी, म्हेत्रे के के, केंद्रे पी एस, मोठे आर ए, गालफाडे एस बी, बळीराम मुंडे, नवनाथ बोबडे हे उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!