मयताच्या डोक्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडून मेंदू रस्त्यावर
गौतम बचुटे/केज
केज येथे केज मांजरसुंबा रोडवर शिक्षक कॉलनी जवळ असलेल्या हॉटेल मधूबन जवळ मोटार सायकल स्वाराला एका भरधाव वेगाने येणाऱ्या ऑईलच्या टँकरने चिरडले. त्यात मोटार सायकल स्वाराच्या डोक्यावरून टँकर गेल्याने डोक्याच्या ठिकऱ्या उडून त्याचा मेंदू रस्त्यावर विखरून जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण जखमी झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:०० च्या सुमारास उमरी येथील राजाभाऊ श्रीपती भैरट आणि नरसिंग भैरट हे दोघे बाजार करून मोटार सायकल क्र. (एम एच/४४/पी-७४५३) वरून गावाकडे जात असताना केज मांजरसुंबा रोडवर असललेल्या शिक्षक कॉलनी जवळच्या हॉटेल मधूबन समोर बीडकडून केजच्या दिशेने येत असलेल्या एका भरधाव वेगातील ऑइलच्या टँकर क्र (एम एच ४४यु ९४४४)ने त्यांना चिरडले. त्या अपघातात राजाभाऊ भैरट यांच्या डोक्या वरुन टँकर गेल्याने त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या उडून मेंदू रस्त्यावर विखुरला गेला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर नरसिंग भैरट हे जखमी झाले आहेत. नरसिंग भैरट या जखमीला घेऊन अम्ब्युलन्स चालक बारगजे यांनी त्यांना स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि महिला पोलीस जमादार रुक्मिण पाचपिंडे, पोलीस जमादार त्रिंबक सोपणे आणि वाहन चालक दराडे हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी अपघातातील टँकर ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणला आहे
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!