आपला बीड जिल्हा

लोकप्रतिनिधींनी मतदान मागण्यांसाठी तरी रस्ते दुरुस्त करुन घ्यावेत

केज तालुक्यातील उखडलेल्या रस्त्यामुळे जनतेचे बेहाल!

केज तालुक्यातील रस्ते तात्काळ दुरुस्त करा अन्यथा छावाच्या वतीने तिव्र अंदोलन करु—शिवाजी (दादा) ठोंबरे

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

सध्या पावसाळ्याचे दिवस आणि त्यात तालुक्यातील अनेक रस्ते हे खड्डयामुळे रस्ते राहिले नसुन हे अपघाती आणि जिवघेणे रस्ते बनले आहेत.

तालुक्यातील सर्वच रस्त्याची दुरुस्ती गेल्या दोन वर्षापासून केली गेली नसल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे ठरु लागले आहे.मात्र तालुक्यातील जनतेवर वाईट दिवस आले आहे असताना आणि ग्रामीण भागातील जनतेच्या व्यथा माहीत असताना लोकप्रतिनिधी मात्र ऐशोआरामात एसी गाडीत फिरत आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील अनेक रस्ते खड्डयाने व्यापले असुन त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणे कठिण झाले आहे. मात्र विलाज नसल्या कारणाने या जिवघेण्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे.

केज तालुक्यातील उंदरी ते पिसेगाव मार्गे केज ,उंदरी ते कुंभारवाडा मार्गे चंदनसावरगाव , केकतसारणी ते चंदनसावरगाव आणि चिंचोलीफाटा ते नांदूरघाट यासह अनेक रस्ते हे रस्ते राहिले नसुन या रस्त्यावर मोठमोठे गुडघ्या एवढाले खड्डे पडले असुन या रस्त्यावर अनेक अपघातही होत आहेत.

तसेच या रस्त्यावरुन शाळेतील विद्यार्थी , महिलांना प्रसुती साठी दवाखान्यात नेहणे, आजारी रुग्न, यांना या खड्डयामुळे वेळेवर जायच्या ठिकाणी पोहचता येत नाही.

अशाच प्रकारची घटना गेल्या वर्षी मोठ्या पावसात घडली होती. त्यात उंदरी गावच्या दोन नागरिकांना आपला जिव गमवावा लागला होता.त्याची पुनरावृत्ती पुन्हा होवु नये.आणि घडली तर याला जिम्मेदार कोण ? सा.बा.विभाग की लोकप्रतिनिधी मतदानाच्या वेळी मतदारांना पुढ्याऱ्यांनी अनेक अश्वासनांची फसवी आमिशे दाखवलेली असतात.

मात्र प्रत्यक्षात तसे अजिबात होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधींचे हे सर्व प्रताप जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

या वेळी मात्र जनता अशा भुलथापा देणाऱ्या पांढरपेशा पुढाऱ्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडणार नसल्याचे जनतेमधुन ऐकावयास मिळत आहे.

केज तालुक्यातील उखडलेले सर्वच्या सर्व रस्ते लोकप्रतिनिधींनी जनतेकडून मतदान मागण्यापुरते तरी संबधीत विभागाला तात्काळ दुरुस्त करण्यास लावुन दुरुस्त करून घ्यावेत. व असे न केल्यास छावा मराठा संघटना रस्त्यावर उतरून तिव्र अंदोलन छेडील असे मत छावा मराठा संघटनेचे बिड जिल्हाध्यक्ष मा. शिवाजी (दादा) ठोंबरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

________________________

केज तालुक्यातील शहरापासून ग्रामीण भागातील खेड्यांना जोडणारे सर्वच रस्ते पार उखडले असुन पावसाळ्यात याचा सर्वसामान्य जनतेला आतोनात त्रास सहन करावा लागत आहे. परंतु आम्ही आता हे सहन करणार नाहीत. कारण सहनशिलतेचा आता अंत जवळ आला असल्याने हे रस्ते संबधित सा.बां.विभाग, आणि जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिधी यांनी तात्काळ दुरुस्त करावा आणि न केल्यास छावा मराठा संघटना स्त्यावर उतरून तिव्र अंदोलन करेल आणि येणाऱ्या निवडणुकीत थापाड्या पुढाऱ्यांना जनतेकडून घरी बसवायला भाग पाडुन त्यांची खरी जागा दाखवून देवु.

शिवाजी (दादा) ठोंबरे

जिल्हाध्यक्ष मराठा छावा संघटना

________________________

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!