Uncategorized
शेतकरी कामगार पक्षाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त कवी प्रा.इंद्रजित भालेराव यांचा व्याख्यानाचा व पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न …
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व क्रांतिसिंह नाना पाटिल यांची जयंती साजरी

वादळवार्ता – केज दि.०३ जुलै
शेतकरी कामगार पक्षाचा ७६ वा वर्धापन दिन केज येथील शिक्षक पतसंस्थेमध्ये मोठ्या संख्येच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .
या बाबत सविस्तर वृत्त असे कि शेतकरी कामगार पक्षाचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व कॉ. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधुन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांचा व्याख्यानाचा तथा वेगवेगळ्या कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेसाहेब ( पापा ) देशमुख हे होते तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणुन कॉ. काशीनाथ कापसे सर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाई बाबुराव जाधव , ॲड. नारायण गोले पाटील , प्रा. हनुमंत भोसले सर , भाई गौतम आडागळे , भाई संग्राम तुपे , शिवाजी ठोंबरे , शिवाजीराव सुरवसे , बाबासाहेब आहिरे , शेख इम्रान रफिक , भाई गणपत कोळपे , डॉ. उत्तम खोडसे , बाळासाहेब गाढवे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व कॉ. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला .
यानंतर यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेकापाचे नेते भाई मोहन गुंड यांनी केले तर विविध मान्यवरांनी तथा आनंदग्रामचे दत्ताभाऊ बारगजे , आपल घर वृद्धाश्रमाच्या सौ. मनिषा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर प्रसिद्ध कवि प्रा.इंद्रजित भालेराव यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अध्यक्षीय समारोप राजेसाहेब ( पापा ) देशमुख यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. हनुमंत सौदागर यांनी केले तर आभार जि.डी. देशमुख यांनी मानले. सदरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते तथा लहान वृद्धांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाई अशोक रोडे, हनुमंत चाळक, महेश गायकवाड, ॲड. अक्षय इंगळे ,मंगेश देशमुख, अशोक डोंगरे, डिगांबर मगर, बाबाराजे गायकवाड, शामराव चिंचोलीकर, मनोज चंदनशिव कृष्णा रोडे, शरद कांबळे, बाळासाहेब गुंड, अजित पौळ, अनंत गलांडे, सनी शेख, दिनकर नेहरकर आदिंनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या अनुशंगाने आदर्श सेवा पुरस्काराने भाई उमाजी राजेंद्रराव देशमुख ( ज्येष्ठ नेते शेकाप ), धाराशिव सुधाकर देशमुख (वृक्षमित्र ) दत्ताभाऊ बारगजे ( संस्थापक आनंदग्राम ) शाहिर बंडू खराड ,मुख्तार शेख चाचू (समाजसेवक ) भाई ज्ञानेश्वर काळे ( ज्येष्ठ नेते शेकाप )कळंब ,डॉ. दिलीप चाळक (मराठा सेवा संघ ) ,सौ. मनिषा पवार (आपलं घर वृद्धाश्रम ) हनुमंत घाडगे सर (लेखक ) शिवशाहिर भाई संभाजीराव शिनगारे (माजी नगरसेवक शेकाप धारूर ) , कॉग्रेड काशिराम शिरसट भाई भास्करराव कुरूंद ज्येष्ठ नेते, शेकाप यांना सन्मानित करण्यात आले.



