वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज येथे स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव निमित्त कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व उमेद अभियान यांच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन पंचायत समिती केज येथे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन श्री डी सी मेंडके तहसीलदार केज यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी श्री राजेंद्र मोराळे गट विकास अधिकारी पंचायत समिती केज हे होते.
या महोस्तवा मध्ये तांदूळजा,माठ, आळु, हादगा फुलं, करटोली, अंबाडी, गुळवेल, पुदिना, चिघळ, शेवगा पान, कपाळफोडी,केना , आगाडा , कुर्डु अशा विविध प्रकारच्या 30 रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या.त्यामध्ये औषधी गुणधर्म असलेले खाण्यासाठी व त्वचा रोग यावर उपयोगी असणाऱ्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या.
सर्व भाज्यांची ओळख करून घेतली. तसेच महिलांनी बनविलेले सात प्रकारच्या रेसिपी पाककृतिची पाहणी केली . रानभाज्या या सहजासहजी आपल्या परिसरामध्ये उपलब्ध होऊ शकतात त्याचा उपयोग मानवी आहारात आवश्य करावा असे केज चे तहसिलदार मेंडके यांनी आपले मत व्यक्त केले .
या रानभाज्यांचे उद्देश,महत्व व संगोपन करटोलीभाजी हि मधुमेह रॊगासाठी गुणकारी आहे, पुदिना हा दमा खोकला यावर गुणकारी आहे तर पाथरी भाजी हि पित्तनाशक,कपाळफोडी कान दुखी असल्यास त्याचा रस कानदुखीवर गुणकारी आहे तसेच गुळवेल हा ताप ,कावीळ व जळजळ यासाठी गुणकारी आहे त्याच बरोबर केना हा त्वचा विकार व सूज कमी करण्यासाठी उपयोगी आहे तर अंबाडी भाजी हि पित्तनाशक या विकारावर गुणकारी मानली जाते वरिल रानभाज्या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात उमेद महिला बचत गटांनी आंबाडीची भाजी, चिघळ भाजी व बाजरी भाकरी, पिवळीची भाकरी यांचा स्टॉल लावला होता.
त्याचा अस्वाद या ठिकाणी भेटी देणाऱ्यांनी आणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यानी घेतला .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अतुल वायसे तालुका कृषि अधिकारी केज यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील बीटीएम आत्मा केज यांनी केले .
तसेच आभार उमेश माळी यांनी मानले. यावेळी श्री सचिन देशपांडे नायब तहसीलदार केज, श्रीमती सविता शेप सहाय्यक गट विकास अधिकारी केज श्री श्याम सुंदर घुमरे कृषि अधिकारी प. स. केज,श्री शरद इंगळे आत्मा सल्लागार समिती सदस्य, श्री दिनकर राऊत जिल्हा शेतकरी सल्लागार समिती सदस्य, रमेश सिरसाट उद्यानपंडित, सर्व मंडळ कृषि अधिकारी केज, कृषि पर्यवेक्षक,कृषि सहाय्यक,आनंद मुंडे आत्मा,उमेदचे माले, वडगने, शेतकरी सदस्य मनोराम पवार, सदाभाऊ घोळवे,राहुल खोडसे, अमोल गोरे, शरद ठोंबरे, अमर ठोबरे, प्रवीण खोडसे,बाबाराजे गायकवाड याचेसह केज शहरातील नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!