आपला बीड जिल्हा

पोलिसांच्या ,जनतेच्या सतर्कतेमुळे चोरी गेलेले सोने हस्तगत ; प्रभारी अधिकारी शंकर वाघमोडे यांनी जनतेचे मानले आभार

केज पोलीसांच्या,जनतेच्या सतर्कतेमुळे चोरी गेलेले सोने हस्तगत ; प्रभारी अधिकारी शंकर वाघमोडे यांनी जनतेचे मानले आभार

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

आज रोजी पोलीस स्टेशन केज येथील प्रभारी अधिकारी शंकर श्रीराम वाघमोडे यांनी सकाळी बस स्थानक येथे प्रवासी नागरिकांना गर्दीच्या वेळी बसमध्ये चढताना व उतरताना अनोळखी महिला या गर्दीचा फायदा घेऊन व हात चालाकी करून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे दागिने चोरी करतात तसेच बसमध्ये बसल्यानंतर पर्स मधील सोने चोरी करतात त्यासाठी आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी आपले डोळे उघडे ठेवून पोलीस प्रशासन साठी एक मदतीचा हात म्हणून आपण मदत करावी असे आवाहन केले होते . सदर अवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला असून आज रोजी झालेला चोरीचा प्रकार अवघ्या काही तासात सुजान नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच आगार प्रमुख यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे आणि पोलीस प्रशासनाच्या कसोटीने काम करण्याच्या पद्धतीमुळे सदर महिलेचे चोरी गेलेले सोने तात्काळ हस्तगत झालेले आहे व आरोपी सुद्धा मिळून आलेले आहे . याबद्दल पोलीस स्टेशन केज प्रभारी अधिकारी शंकर श्रीराम वाघमोडे यांनी सर्व सुजान नागरिक यांचे आभार मानले आहे . तसेच आगार प्रमुख यांनी सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे त्यांची सुद्धा आभार व्यक्त केले आहे .तसेच बस स्टॅन्ड येथे लवकरात लवकर पोलीस चौकी करण्यात येईल त्यासाठी केज येथील सामाजिक कार्यासाठी झटत असलेली संस्था मदत करणार आहे अधिकृत माहिती मिळताच त्यांचे नाव सुद्धा सांगून प्रत्यक्षात कृती करण्यात येईल .

अशाच प्रकारे प्रत्येक नागरिकांनी आपले डोळे उघडे ठेवून पोलिसांचे डोळे बनावे व पोलीस प्रशासनसाठी मदत करण्यासाठी त्यांचे हात बनावे जेणेकरून सर्व कामे जनतेला पाहिजे तशी होतील . असे विचार केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शंकर वाघमोडे यांनी व्यक्त केले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!