आपला बीड जिल्हाशिक्षण

शालेय विद्यार्थ्यांनी केकसाठी व्यर्थ खर्च न करता विद्यार्थ्यास दिली महापुरुषांच्या पुस्तकांची भेट

वादळवार्ता – केज

वाढदिवस म्हणजे एक भलामोठा केक , रंगबेरंगी मोठ- मोठी फुगे नि चॉकलेट त्यामध्ये सर्व मित्रपरिवार आणी छोटीशी बच्चे लोकांची पार्टी एवढेच परंतु हे सगळे नियोजन करताने लागतो तो खर्च मग तो खर्च वाढदिवस झाल्या नंतर व्यर्थ होतो कि अव्यर्थ. परंतु या व्यर्थ खर्चास टाळुन शालेय विद्यार्थ्यानी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला तो म्हणजे ज्याचा वाढदिवस आहे त्या विद्यार्थी तथा विद्यार्थीनिस पुस्तकांची भेट द्यायची.

या बाबत वृत असे कि केज शहरातील नामांकित इंग्लिश माध्यमाची शाळा पवनराजे इंग्लिश स्कुल केज येथील इयत्ता ७ वी मधील विद्यार्थ्यांनी स्तुत्य उपक्रम हाती घेऊन इयत्ता ७ वी मधील संस्कार याचा वाढदिवस केक कापुन नव्हे तर त्यास महापुरुषांची तसेच जनरलन नॉलेजच्या पुस्तकांची भेट देऊन साजरा करण्यात आला . या पुस्तकांची भेट घेण्यासाठी त्यांनी प्रत्येकी २० रुपयांप्रमाने पैसे एकत्र केले होते . यामुळे शाळेचे प्रिंसीपल अशोक मस्के यांच्या सह वर्गशिक्षक डी.एस. चौरे सर यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!