आपला बीड जिल्हा

लम्पी स्किनमुळे साळेगावचा जनावरांचा आठवडी बाजार बंद !

लम्पी स्किनमुळे साळेगावचा जनावरांचा आठवडी बाजार बंद !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

जनावरांना लॅम्पी स्किन या आजाराची मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्यामुळे त्याचा प्रसार आणि संसर्ग थांबवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांच्या निर्देशा वरून साळेगाव ता. केज येथे गुरुवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार बंद करण्यात येत असल्याची माहिती सरपंच कैलास जाधव व ग्रामसेवक ओम चोपणे यांनी दिली आहे.

गुरुवार दि. ८ सप्टेंबर रोजी भरणारा बाजार भरणार नसल्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी गैरसोय होऊ नये आणि या आदेशाची नोंद घेण्याचे आवाहन साळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच बाजार संबंधी पुढील आदेश कळविण्यात येतील अशीही माहिती दिली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!