आपला बीड जिल्हाआपले केजनैसर्गिकशेतकरी

अवकाळी पाऊस गारपीटीमुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ स्थळ पंचनामे करा – बजरंग सोनवणे

वादळवार्ता – केज

दि ८ शनिवार रोजी सायंकाळपासून विविध भागात प्रचंड अवकाळी पाऊस व गारांचा मारा झाला आहे. विशेषतः केज मतदारसंघातील काही गावांना अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके, फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पशुधन मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या सौर पंप, विद्यूत खांबांची पडझड झाली आहे. यापूर्वी देखील काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे १०० टक्के नुकसान झाले होते. परंतु अद्याप सरकारकडून अनुदान मिळालेले नाही.

यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. गारपीट नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. त्यामुळे आता तरी सरकारने गांभीर्याने घेऊन प्रशासनाला २४ तासात स्थळ पंचनामे करण्याचे आदेश जारी करावेत तसेच ही सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर राबवून लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर आंदोलनासाठी उतरणार असल्याचे मत शेतकरीपुत्र तथा येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी वादळ वार्ता च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!