
वादळवार्ता – केज
ऐन स्वातंत्र्यदिनी केज शहरातील व्यापाऱ्यानी स्वच्छतेच्या संदर्भाने तथा भाजपा वैद्यकीय जिल्हाध्यक्ष वासुदेव नेहरकर यांच्या सोशल मिडियावरील अंदोलनाच्या संदेशाला धावुन हातामध्ये झाडु घेऊन अंदोलन केले.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचा ढिसाळ कारभार केज शहरातील नागरीकाना चांगलाच पाठ झालेला असताना तसेच सर्वसामान्य नागरीकांच्या अंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे केज येथील स्वच्छतेच्या प्रश्नासंबधी आवाज उठवत भाजपाचे वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नेहरकर यांच्या सह केज येथील मंगळवार पेठेतील व्यापारी वर्गांनी अस्वच्छतेला वैतागुन हातात झाडु घेत केज नगरपंचायतच्या कार्यालयामध्ये जाऊन झाडुन – घे अंदोलन करत सत्ताधार्यांचा खरा विकास केजच्या चावडीसमोर आनला आहे. मात्र निवेदन घेण्यासाठी ना मुख्याधिकारी होते ना सत्ताधारी ना कर्मचारी त्यामुळे भाजपाच्या वैद्यकीय अध्यक्षांचे झाडुन – घे अंदोलनामुळे तेथुन पळ काढला असावा कि वृक्षलागवडीस गेले असावे कि कामानिमित्त अशीच चर्चा केज शहरामध्ये जागो-जागी होतं आहे.
सदरील अंदोलनामध्ये केज शहरातील मंगळवार पेठेतील मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होता.
व्यापार्यानी तथा भाजपा वैद्यकीय अध्यक्षांनी केलेल्या अंदोलनामुळे हा सध्याचा स्वच्छतेचा प्रश्न आहे कि भुतकाळातील विकास कामांचा प्रश्न आहे कि और कांही अशी केज शहरातील नागरीकांत उलट- सुलट चर्चा रंगली आहे.



