आंदोलनआपला बीड जिल्हाआपले केज

एकच मिशन जुनी पेन्शन साठी एसएससी परीक्षा परीक्षा केंद्र क्रमांक 2436 शासनाचा निषेध व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून केले बोर्डाचे कामकाज

वादळवार्ता – केज

सध्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा चालू असून माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 करिता वसुंधरा माध्यमिक विद्यालय हे नियमित परीक्षा केंद्र असून परीक्षा केंद्र क्रमांक 2436 आहे. वसुंधरा माध्यमिक विद्यालय पैठण या केंद्राचे केंद्र संचालक श्री सुशीलकुमार गायकवाड असुन या विद्यालयातील 15 कर्मचारी हे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे आहेत. तरी त्यांना जुनी पेन्शन योजनेपासुन ते वंचित आहेत.

एसएससी परीक्षार्थींचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केंद्रावरील सर्व कर्मचारी काळी फित लावून कर्तव्य बजावीत आहेत.या सर्वांची एकच मागणी आहे ती म्हणजे एकच मिशन जुनी पेन्शन. शासनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांना जुनी पेन्शन बहाल करावी अशी सर्वांनी विनंती केली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!