पंधरा दिवसांत मागणी मान्य न केल्यास शेळ्यामेंढ्या तहसील च्या प्रांगणात सोडु पशुपालकांचा ईशारा
वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
पुर्वी पासुन शासनाने अनेक गावात नापिक किंवा मोठा शिवार असणाऱ्या गावात गावातील गुरे,शेळ्या, मेंढ्या चालण्यासाठी गायरान राखुन ठेवलेले आहे. मात्र वाढती लोकसंख्या आणि कमी पडत असलेली जमीन यावर गोरगरीब जनता यांनी उदारनिर्वाहा करीता अनेक गावात त्या पडिक गायरान जमीनीवर अतिक्रमण केलेले आहे. तसेच अतिक्रमण नांदूरघाट आणि रामेश्वरवाडी या ठिकाणच्या गारानावर देखील पारधी, आणि मागासवर्गीय लोकांनी केलेले आहे.मात्र नांदूरघाट गावातील शेळ्यामेंढ्या पालकांनी आता हे कसत असलेले पडीक गायरान जमीन आमच्या शेळ्या मेंढ्यांना खुले करुन चारण्यासाठी द्यावे अशी लेखी मागणी केजचे तहसीलदार यांचेकडे नांदूरघाटच्या शेळ्यामेंढ्या पालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रात अनेक गावात गावातील गुरे किंवा शेळ्या, मेंढ्या चारण्यासाठी ज्या गावात नापिक जमीन आहे. अथवा ज्या गावचा शिवार मोठा आहे. अशा गावात गायरान जमीन म्हणून काही जमीन आरक्षित करुन ठेवलेली आहे. तशाच प्रकारे केज तालुक्यातील नांदूरघाट येथेही नांदूरघाट व रामेश्वरवाडी येथे मोठ्या प्रमाणावर गायारान हि चांगल्या व मध्यम प्रतीची जमीन असुन त्या जमीनीवर नांदूरघाट व आजुबाजुच्या गावातील गोरगरीब लोकांनी आपला उदारनिर्वाह भागवण्यासाठी सदरील शासकीय गायरान जमीनीवर अतिक्रमण केले असुन सध्या ते हि गायरान जमीनीतुन कसत आहेत. परंतु आता गावच्या शिवारात कुठेही व कोणाचीही पडिक जमीन नसुन गायरानही शिल्लक राहिले नाही. मग आम्ही आमच्या शेळ्यामेंढ्या चारायच्या कुठे ? या करिता नांदूरघाटच्या शेळ्या, मेंढपाळांनी सदरील गायरान मोकळे करुन आमच्या जनावरांना चारण्यासाठी खुले करून द्यावे. म्हणून काही दिवसांपूर्वी आपल्या शेळ्या मेंढ्या घेवुन नांदूरघाटच्या ग्रामपंचायतवर अंदोलन केले होते. त्याचा काही परिणाम दिसून येत नसल्याने शेळ्या मेंढ्या पालक या लोकांनी काल दि. ९ बुधवार रोजी केज नायब तहसीलदार यांना निवेदन दिले असून. येत्या पंधरा दिवसांत या शासकीय गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढुन हे गायरान कसुन खाण्यासाठी नसुन गुरे,ढोरे, शेळ्यामेंढ्या चारण्यासाठी शासनाने मोकळे करुन जनावरे, शेळया मेंढ्या चारण्यासाठी खुले करुन द्या येत्या पंधरा दिवसांत सदरील गायरान रिकामे करून दिले नाही तर नांदूरघाट व परिसरातील पशुपालक आपापली जनावरे व शेळ्यामेंढ्या घेवुन केज तहसील वर अंदोलन करण्यात येईल व जोपर्यंत मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत केज तहसील या ठिकाणीच गुरेढोरे व शेळ्यामेंढ्या घेवुन तळ ठोकुन बसु असे लेखी निवेदन केजचे तहसीलदार यांना नांदूरघाटच्या शेळ्यामेंढ्या पालकांनी दिले आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते जिवन (आबा) हांगे, सरपंच पांडुरंग चांगण, सोमा काकडे , यशवंत शेजाळ, गणेश गुरव , आसाराम परबळे, तानाजी गायके, महादेव परबळे, बालाजी शेजाळ, भिकाजी गिरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन केजचे नायब तहसीलदार मा. सचिन देशपांडे यांना देण्यात आले असुन आपण दिलेले निवेदन वरिष्ठांना पाठवण्यात येईल असे नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी निवेदनकर्त्यांना सांगतले. यावेळी गावचे सामाजिक कार्यकर्ते मा.जिवन(आबा) हांगे, सरपंच पांडुरंग चांगण, बाळासाहेब जाधव, पशुपालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.