राज्यसामाजीक

हे सरकार तृतीयपंथीयांना निश्चित सन्मान देणार – मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे 

तृतीय पंथीयांना पोलीस भरतीमध्ये संधी दिल्याबद्दल सरकारचे शेख आयेशा यांनी मानले जाहीर आभार

वादळवार्ता वार्तांकन – मुंबई 

हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. तृतीय पंथीयांना देखील राज्य सरकार भविष्यात निश्चित त्यांच्या हक्काचा सन्मान देण्यासाठी कटिबद्ध आहे. आपण केलेल्या मागणीनुसार तृतीयपंथीयांना शासकीय सेवेत पोलीस भरती पासून आरक्षण देण्यास सुरुवात करण्याचा क्रांतिकारी निर्णय याच सरकारने सर्वप्रथम घेतला आहे. आपल्या मागणीनुसार भविष्यात राज्यस्तरीय किन्नर महोत्सवाला देखील राज्य सरकार निश्चित खंबीरपणे पाठीशी उभे राहील असे स्पष्ट अभिवचन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मीडिया डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत आश्रय सेवा केंद्राचे अध्यक्ष शेख आयेशा यांच्याकडून सत्कार स्वीकारल्यानंतर वर्षा बंगला निवासस्थानी दिला

तृतीय पंथीयांना शासकीय सेवेत नोकरीचे आरक्षण देण्यात यावे तरच त्यांना रस्त्यावर उभारून टाळी वाजवत पैसे मागून लज्जास्पद जीवन जगावे लागणार नाही. अशी मागणी सरकारकडे पत्रकार विकास संघ अंतर्गत आश्रय सेवा केंद्राच्या वतीने अध्यक्षा शेख आयेशा यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली होती.

या मागणीसाठी मागील वर्षभरापासून त्यांचा पाठपुरावा सुरू होता. दरम्यान राज्य सरकारने या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पोलीस भरतीमध्ये ट्रांजेंडर तृतीयपंथी यांना नोकरीत पोलीस भरतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात सरकार निश्चित सहानुभूती दाखवेल अशी हमी न्यायालयाला देऊन नोकरीमध्ये पोलीस भरतीमध्ये संधी दिल्याबद्दल 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची वर्षा निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन मीडिया डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा शेख आयेशा रफिक यांनी सरकारचे जाहीर आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना ट्रांजेंडरच्या वतीने मोठा पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन आभाराचे सन्मानपत्र दिले. याप्रसंगी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आश्रय सेवा केंद्राचे अध्यक्ष शेख आयेशा यांना म्हणाले, भविष्यात देखील तृतीयपंथीयांच्या हिताचे निर्णय हे सरकार निश्चित घेईल. आपण तृतीयपंथीयांना सन्मान देण्यासाठी जे काम करत आहात ते काम कौतुकास पात्र आहे.हे सरकार देखील सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे.लवकरच आपल्या मागणीनुसार तृतीयपंथीयांचे देखील एक स्वतंत्र ट्रांजेंडर राज्यस्तरीय किन्नर महोत्सव आपण घ्या. सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून तृतीयपंथीयांचे शिष्टमंडळासमवेत सविस्तर बैठक घेऊन शासन निर्णय निश्चित घेऊ यासाठी आपण पुढाकार घ्या सरकार निश्चित आपल्या मागण्यांच्या पाठीशी उभे राहीलअशी हमी दिली. याप्रसंगी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मानस भगिनी शुभांगी नांदगावकर यांची विशेष उपस्थिती होती.

त्यांनी ही भेट घडवून आणत मुख्यमंत्री यांना तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आश्रय सेवा केंद्राचे अध्यक्ष शेख आयेशा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे साकडे घातले याप्रसंगी मुंबई येथील बाळासाहेबांची शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!