आपला बीड जिल्हा

भगवान आश्रमात आनंदी दिवाळीचे गुरुवारी आयोजन;दिव्यांग व गरीबांना होणार मोफत कपडे, फराळाचे वाटप

भागवतभुषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांचा स्तुत्य उपक्रम.

वादळवार्ता वार्तांकन – केज 

भगवान श्रीकृष्ण आश्रम केज येथे गुरुवारी आनंदी दिपावली महोत्सव अपंग, दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तुभेट व फराळ वाटपाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आला आहे .

Home

तरी सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की ,प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान श्रीकृष्ण आश्रम केज येथे आनंदी दिपावली निमित्त दिव्यांग,अपंग,अनाथ व्यक्तींना जीवनावश्यक वस्तु भेट व फराळ वाटप आणी प्रवचन सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

प्रवचनकार भागवत भूषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री,संस्थापक अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण आश्रम,केज यांचे प्रवचन गुरुवारी सकाळी ११.०० ते १.०० वाजता होणार असुन त्यानंतर दिव्यांग व गरीबांना मोफत साहित्य वाटप दुपारी १ -०० ते २-०० वाजता आणी त्यानंतर दुपारी २.०० वाजल्यानंतर महाप्रसाद होणार आहे.

उत्सवास व स्नेहभोजनास समाज प्रेमींनी उपस्थीत रहावे तसेच वस्तुरुपाने मदत करण्याचे आवाहन आयोजक भागवतभुषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री व भगवान श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार भगवान श्रीकृष्ण आश्रम बीड रोड केज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!