वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
एकिकडे शासन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवत असले तरी काही योजना या शेतकऱ्यांच्या जिवघेण्या ठरत आहेत. त्यात बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज तर दिले मात्र ते वेळेवर नाही. आणि दिलेल्या कर्जाची परतफेड तगादा लावुन आणि व्याज,दंडव्याजाची आकारणी करुन केल्याने शेतकरी हतबल होवुन टोकाची पावले उचलत आहे. अशीच घटना केज तालुक्यातील बेंगळवाडी येथे घडली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील बेंगळवाडी येथील तरुण शेतकरी दिलीप बाबासाहेब रोमन यांनी महाराष्ट्र बँकेकडून काही दिवसांपूर्वी एक लाख रुपयाचे पिककर्ज घेतले होते.
परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील उत्पन्नाने साथ दिली नाही. आणि कधी कमी कधी जास्तीच्या पावसामुळे शेतातील पिक आलेच नाही.मग बँकेचे कर्ज कसे फेडणार या आर्थिक विवंचनेत असणऱ्या केज तालुक्यातील बेंगळवाडी येथील तरुण शेतकरी दिलीप बाबासाहेब रोमन वय २८ वर्षे यांनी खचुन जावुन आता बँकेचे कर्ज कसे फेडायचे या नैरशातुन दारू पिऊन विषारी औषध घेतल्याने त्यांना उपचारासाठी बिड येथील जिल्हा रुग्णालयात वार्ड नं ६ मध्ये भरती करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असताना दि. २६ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ७:०० वा. मृत्यू झाला. सदरील घटनेची केज पोलीस स्टेशन मध्ये दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी बाबासाहेब उमाजी रोमन वय ६५ वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन दिलीप बाबासाहेब रोमन वय २८ वर्षे रा. बेंगळवाडी ता.केज जि.बीड यांचकडे महाराष्ट्र बँकेचे एक लाख रुपये कर्ज होते. शेतातील पिकानी तर साथ दिली नाही. मग या कर्जाची परतफेड कशी करणार या आर्थिक विवंचनेत असणाऱ्या दिलीप रोमन याने दारु व विषारी औषध पिउन आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, आई ,वडील असा परिवार आहे. अशी फिर्याद दिली असुन या घटनेचा केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरील घटनेचा केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशानुसार केज पोलिस ठाण्याचे अमंलदार म.पो.ना. ९१ पाचपिंडे मँडम यांचेसह पो.ना.सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!