आपला बीड जिल्हाआपले केज

केजचे सर्वपरिचित नगसेवकपती पप्पु आण्णा इनामदार यांचे अपघाती निधन.

वादळवार्ता – दुःखद वार्ता

केज शहरातील सामाजीक तथा राजकीय कार्यात सक्रीयपणे , निर्भिडपने काम करणारे तसेच पप्पु आण्णा या नावाने शहरात परिचित असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आज केज – बीड रोडवर झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे.

पप्पू इनामदार हे बीडकडे जात असताना त्यांची गाडी मस्साजोग जवळ पलटी झाली अन त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.अपघात झाल्यानंतर तात्काळ त्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पप्पू इनामदार हे मागच्या अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर त्यांच्या पत्नी सध्या केज नगरपंचायत मध्ये नगरसेविका म्हणून काम पाहत आहेत. तर सदरील अपघातात अन्य एकजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!