Uncategorized

पत्त्याच्या क्लबवर धाड अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांची धाड…

सात जुगारी ताब्यात तर तिघे पळून गेले : धाडीत ७० हजार रु. चा मुद्देमाल जप्त!

वादळ वार्ता – गौतम बचुटे

अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी केज तालुक्यात पत्त्याच्या क्लबवर धाड टाकून सात जुगारी ताब्यात घेतले आणि तिघे पळून गेले. पोलिसांनी धाडीत सुमारे ७० हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.

दि. १० फेब्रुवारी रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, केज पोलीस स्टेशन हद्दीत कोरडेवाडी येथे पत्याचा क्लब चालू आहे. माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे मॅडम आणि पथकातील संजय राठोड, अनिल दौंड, तानाजी तागड, महिला पोलीस हे कॉन्स्टेबल वंदना गायकवाड आणि रामेश्वर सुरवसे यांना कारवाईचा आदेश दिला. आदेश मिळताच पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन दुपारी ४:०० वा. जाऊन त्या ठिकाणी अचानक जाऊन छापा मारला असता तेथे तिर्रट नावाचा जुगार सुरू होता. तिर्रट खेळत असलेले रामभाऊ जयवंत शिंदे, भगवान सिताराम कोरडे, केशव मारुती शिंदे, महिंद्रा सोपानराव यादव, आश्रुवा सुखदेव यादव, मधुकर अंबादास परळकर, रामकिसन निवृत्ती यादव या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.तर गंगाधर जयवंतराव शिंदे, दत्ता मधुकर कोरडे व दत्ता सुग्रीव गित्ते हे तीघेजन पळून गेले. या धाडीत ६९ हजार ६५० रु. आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल याब्यात घेतला.

पोलीस नाईक रामेश्वर श्रीराम सुरवसे यांच्या फिर्यादी वरून दहा जुगाऱ्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतीबंधक कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!