आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

अभ्यास केलेला लक्षात राहत नसल्याच्या टेन्शनमुळे दहावीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या

वादळवार्तागौतम बचुटे

केलेला अभ्यास लक्षात राहत नसल्याच्या मानसिक दबावातून आणि टेन्शनमुळे केज तालुक्यात एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या बाबतची माहीती अशी की, केज तालुक्यातील कोठी येथील प्रेरणा किसन डोंगरे ही इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिचे वडील गंगामाऊली साखर साखर कारखान्यात कामाला आहेत. सोमवार दि. १६ जानेवारी रोजी प्रेरणा व तिची आई घरी असताना रात्री १०:३० ते ११:०० वाजण्याच्या सुमारास प्रेरणा हिने घरातील लोखंडी चॅनलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी मयत प्रेरणा डोंगरे हिचे वडील किसन ज्ञानोबा डोंगरे यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की प्रेरणाच्या जुनाट आजारामुळे तिच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत असल्याने तिने केलेला अभ्यास लक्षात राहत नव्हता. या ताण तणावातून आणि अभ्यासाच्या टेन्शनमुळे तिने आत्महत्या केली. या तिच्या आत्महत्ये बाबत त्यांची कुणा विषयी तक्रार किंवा संशय नाही.

या प्रकरणी फौजदारी दंड संहिता प्रक्रिया १७४ नुसार केज पोलीस ठाण्यात आकस्मिक गुह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!