Uncategorized
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या केज तालुका अध्यक्ष पदी किशोर भालेराव यांची निवड

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नवीन निवडी जाहीर..
वादळवार्ता – केज दि १६ वार-रविवार
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना केज संघटनेची अत्यंत महत्त्वाची सभा शिक्षक पतसंस्था केज या ठिकाणी दिनांक 15 / 07 /2023 या रोजी जिल्हा अध्यक्ष श्री विष्णू आडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज पार पडली या कार्यक्रमाला जिल्हा प्रवक्ते श्री राहुल उंडाळे, श्री. विक्रम डोईफोडे श्री पाळवदे सर जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्रीमती अश्विनी गिरी, यांची उपस्थिती लाभली तसेच संपूर्ण तालुका कार्यकारणी तसेच जुनी पेन्शन मिळावी या उद्देशासाठी मनःपूर्वक लढणारे प्रमुख शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री काकनाळे यांनी केले सन 2014 ते 2023 विविध तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय आंदोलनामध्ये तालुका पातळीवरील संघटनेचा सहभाग याविषयी तसेच सर्व पेन्शन साठी लखणाऱ्या शिलेदारांनी उत्कृष्ट साथ दिली . तसेच संघटनेचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी नवीन उत्साही कार्यशील व्यक्तींची तालुका कार्यकारणी मध्ये निवड व्हावी असा प्रस्ताव ठेवला. सर्वानुमते केज शिक्षक पतसंस्थेचे कोषाध्यक्ष श्री किशोर भालेराव यांची केज तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर मावळते ता. अध्यक्ष श्री काकनाळे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तालुका उपाध्यक्ष युवराज हिरवे , मोहसीन खुरेशी ता सचिव श्री. विष्णू यादव,श्री अविनाश बनसोडे यांची तालुका कार्याध्यक्ष, तुषार पाटील यांची तालुका प्रवक्ता, श्री सचिन क्षीरसागर यांची तालुका प्रसिद्ध प्रमुख, श्री अनंत जाधवर सहसचिव, श्री चैतन्य तांबवेकर कोषाध्यक्ष, श्री मोहन ढाकणे तालुका संघटक, श्री अनिल कोरडे तालुका संपर्कप्रमुख, मार्गदर्शक ज्योतीराम केदार , महिला तालुका अध्यक्ष श्रीमती गीता अंडील मॅडम, महिला तालुका सचिव श्रीमती सोनाली धस मॅडम तसेच केंद्रनिहाय केंद्र संघटक विडा भास्कर राख, सारणी सुनील नेहरकर, आडस अनिल शितोळे, नांदुर घाट बाबुराव तांबडे, वाघेबाभूळगाव रामेश्वर आंधळे, लव्हूरी राहुल गालफाडे, होळ सिद्धेश्वर जाधव, चिंचोली माळी दीपक मोरे, युसुफ वडगाव जयराम मांगडे , केज सरिता ढाकणे, टाकळी संगीता मुंडे मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली. एकच मिशन जुनी पेन्शन, *जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा* या घोषणा देण्यात आल्या . सर्व नवनियुक्त तालुका कार्यकारणीस जिल्हा कार्यकारणी, राज्य कार्यकारणीने शुभेच्छा दिल्या आहेत…
सर्व शिलेदारांना सोबत घेऊन जुन्या पेन्शन चा लढा अधिक तीव्र करून जो पर्यत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहील – किशोर भालेराव



