आपला बीड जिल्हा

गुलाब पाटलावर गुन्हा नोंद करा : केज शिवसेनेची मागणी

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची बदनामी केल्या प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केज तालुका शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. मात्र ४ नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर मधील शिवसेनेच्या उपनेत्या सुषमताई अंधारे यांची नियोजित सभा प्रशासनावर दबाव टाकून सभा रद्द केली.

तसेच सुषमा अंधारे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करून महिलांचा अवमान केला. त्याच्या निषेधार्थ केज तालुका शिवसेनेच्या वतीने दि. ७ नोव्हेंबर रोजी केज येथे निदर्शने करून महिलांचा अपमान करणाऱ्या राज्याच्या मंत्र्यावर गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी संपर्क नेते चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडूदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या सुचने नुसार केज पोलिस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेना केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, विधानसभा प्रमुख अशोक जाधव, महिला आघाडी तालुका प्रमुख अश्विनी बडे, युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, शहर प्रमुख तात्या रोडे, किशोर घुले, अनिल ठोंबरे, पप्पू ढगे, ज्योतिकांत कलसकर, राहुल अंधारे, राहुल फुके, पप्पू कोल्हे, निलेश मुरकुटे, गणेश लोंढे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!