वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील उमरी येथील रहिवासी असलेले पुणे येथे सैन्यात कर्तव्यवर असणारे मच्छिंद्र मुरलीधर मुळे या सैन्य दलातील जवानांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.
भारतीय सैन्य दलातील मच्छीन्द्र मुरलीधर मुळे वय (४० वर्ष) हे पुणे येथे सैन्यामध्ये सेवेत होते. मंगळवार दि. १ नोव्हेंबर रोजी पुणे येथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले; परंतु त्यांचे मंगळवारी रात्री दुर्दैवी निधन झाले. त्यांच्यावर उमरी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मच्छिंद्र मुळे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार असून त्यांचे मोठे बंधुही सैन्यात कार्यरत आहेत.